Nashik Crime Uddhav Nimse : नाशिक (Nashik) शहराच्या नांदूर नाका (Nandur Naka) येथे 22 ऑगस्ट रोजी राहुल धोत्रेवर (Rahul Dhotre) प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 29 ऑगस्टला उपचारादरम्यान राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला होता. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी भाजपचे (BJP) माजी नगरसेवक उद्धव निमसेसह (Uddhav Nimse) त्यांच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल झाला होता. यानंतर उद्धव निमसे फरार झाले होते. जवळपास 20 दिवस फरार असलेले उद्धव निमसे आज सोमवारी (दि. 15) अखेर पोलिसांसमोर शरण आले आहेत. पोलिसांच्या चार पथकांकडून सातत्याने शोध घेऊनही यापूर्वी त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर न्यायालयीन धक्का बसल्यानंतर ते स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
22 ऑगस्ट रोजी नांदूर नाका येथे दुचाकीचे चाक पायावर गेल्याच्या किरकोळ कारणावरून उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे गटात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि त्यानंतर मोठा जमाव गोळा झाला. या जमावाने राहुल धोत्रे आणि त्याचे मित्र अजय कुसाळकर यांच्यावर लाकडी, लोखंडी दांडक्यांनी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. राहुलवर उपचार सुरू असताना 29 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
अनेक आरोपींचा सहभाग
या हल्ल्यात उद्धव निमसे, पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्नील बागूल, सुधीर उर्फ गोट्या निमसे, अक्षय पगार, मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप यांच्यासह 10-15 जण सहभागी होते. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार उद्धव निमसे हे 20 दिवसांपेक्षा अधिक काळ फरार होते.
उद्धव निमसे पोलिसांना शरण
फरारी असलेल्या निमसे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयानेही फेटाळला. अखेर न्यायालयीन झटका बसल्यावर उद्धव निमसे पोलिसांसमोर शरण आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव निमसे गेल्या 20 दिवसांत गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांत प्रवास करत होते. कुठेही हॉटेलमध्ये न थांबता ते पर्यटनस्थळे, देवस्थाने अशा ठिकाणी फिरत होते. एका ट्रॅव्हल बसनेच त्यांनी सर्व प्रवास केला. गुजरात एअरपोर्टवर त्यांचा ड्रायव्हर शेवटचा संपर्कात आल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या