Bollywood Biggest Flop Movie : भारतात चित्रपट निर्मिती हा खर्चिक व्यवसाय आहे. निर्मितीपासून ते कास्टिंग आणि व्हीएफएक्सपर्यंत, बहुतेक उद्योगांमध्ये मोठ्या चित्रपटांची किंमत अनेक कोटींमध्ये असते. जितका मोठा स्टार तितके मोठे बजेट. पूर्वी अभिनेता सलमान खानचा सिनेमा म्हणजे 100 कोटी कमावणार, अशी धारणा असायची. मात्र, आता सोशल मिडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळात लोक विशेष आणि खास सिनेमा असल्याशिवाय त्यांचा वेळ देत नाहीत.


सध्याच्या काळात सिनेमातील गुंतवणुकीच्या शाश्वती नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये असाही एक सिनेमा आहे, ज्या सिनेमाला बनवण्यासाठी 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, या सिनेमातून कमाई केवळ 60 हजार रुपये झाली होती. हा बॉलिवूडमधील सर्वांत फ्लॉप चित्रपट आहे. द लेडी किलर, असं या चित्रपटाचं नाव आहे. 


अजय बहल यांचा 'द लेडी किलर', हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र. भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला होता.  अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर होता.


भूषण कुमार यांनी त्याच्या T-Series बॅनरखाली निर्मिती केलेल्या 'द लेडी किलर' या चित्रपटाची निर्मिती 2022 मध्ये सुरू झाली. रिपोर्टनुसार, 2023 मध्ये अनेक री-शूट झाल्यामुळे चित्रपटाचे बजेट फार जास्त झाले होते. शेवटी या चित्रपटाच्या निर्मितीची किंमत ₹45 कोटी झाली होती. मात्र, रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या सिनेमाकडे ढुंकूनही पाहिले नाही. सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात संपूर्ण भारतभर फक्त 293 तिकिटे विकली गेली. हा सिनेमा केवळ 60 हजारांची कमाई करु शकला. 


दरम्यान, एक रिपोर्टनुसार, द लेडी किलर अपूर्ण रिलीझ झाला होता. क्लायमॅक्स पूर्णपणे शूट झाला नव्हता. चित्रपटाचे दिग्दर्शक अजय बहल यांनी सुरुवातीला एका मुलाखतीत या दाव्याचे समर्थन केले होते. मात्र, नंतर त्यांनी त्यांचे वक्तव्य माघारी घेतले. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की द लेडी किलरला नोव्हेंबर 2023 मध्ये भारतातील मूठभर चित्रपटगृहांमध्ये फक्त टोकन रिलीझ मिळाले होते. ट्रेड इनसाइडर्सनुसार, निर्मात्यांनी डिसेंबरमध्ये स्ट्रीमिंग रिलीजसाठी OTT प्लॅटफॉर्म Netflix सोबत करार केला होता. त्यासाठी, चित्रपटाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेमागृहात रिलीज करणे आवश्यक होते, जे अयशस्वी झाल्यास स्ट्रीमिंग करार अवैध ठरवला जाणार होता. त्यामुळेच ‘अपूर्ण’ चित्रपट कोणत्याही प्रसिद्धीशिवाय प्रदर्शित झाला.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Laxman Utekar apologies : शिर्के घराण्याने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली, काय काय म्हणाले?