Humraaz Actress Vimi: बॉलिवुडमध्ये विमी (Actress Vimi) नावाची एक अभिनेत्री होऊन गेली. या अभिनेत्रीला अगदी कमी काळात मोठी प्रसिद्धी लाभली. भारतभरात तिचे चाहते निर्माण झाले. विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या जोरावर या अभिनेत्रीने मोठी संपत्ती कमवली होती. मात्र जेवढ्या कमी काळात या अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळाली, तेवढ्याच लवकर तिच्या करिअरला उतरली कळा लागली. या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी तरुण आतुर असायचे. मात्र ती काळाच्या ओघात अशी अदृश्य झाली की नंतर तिले सगळेच विसरून गेले.
हमराज चित्रपटाने दिली ओळख
विमी ही अभिनेत्री त्या काळात चांगलीच प्रसिद्ध होती. तिने सुनिल दत्त, शशी कपूर तसेच राज कुमार या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले होतं. बी आर चोपड़ा यांचा सस्पेन्स थ्रिलर हमराज हा चित्रपट चांगलाच हिट ठऱला. या चित्रपटात सुनिल दत्त,, राजकुमार आणि बलराज साहनी आदी दिग्गज अभिनेते होते. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरले.या चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
रातोरात झाली अभिनेत्री स्टार
हमराज या चित्रपटातनंतर विमीला एक वेगळी ओळख मिळाली. तिला संपूर्ण भारतभरात ओळखलं जाऊ लागलं. सगळीकडे तिचीच चर्चा होत होती. त्या काळात विमी प्रत्येक मॅगझीनच्या कवर पेजवर झळकायची. त्या काळात मॅगझीनच्या कव्हर पेजवर येणं फार मोठी बाब मानले जायचे. अशा काळात सगळीकडे विमीचाच बोलबाला होता. रातोरात ती स्टाईल आयकॉन बनली होती.
करिअर कसं उद्ध्वस्त झालं?
हमराज या चित्रपटापासून जसं तिला प्रसिद्धी मिळाली, तेवढ्याच वेगाने तिची उतरती कळा चालू झाली. हमराज या चित्रपटानंतर तिने इतरही चित्रपटांत काम केलं. मात्र ही हिरोईन महराज चित्रपटापुरती आली आणि निघून गेली, असं तेव्हा सर्रास म्हटलं जाऊ लागलं. हमराज या चित्रपटानंतर तिने आबरू, वचन तसेच पतंगा या तीन चित्रपटांत काम केलं. मात्र यापैकी एकही चित्रपट फार चांगला चालला नाही. आबरू या चित्रपटात तिने दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या अभिनेत्रीने शशी कपूर यांच्यासोबत पतंगा आणि वचन हे दोन चित्रपट केले. मात्र यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यामुळे या अभिनेत्रीच्या करिअरची उतरती कळा चालू झाली.
जॉलीसोबत राहायला गेली अन् उद्धवस्त झाली
हळूहळू विमीला चित्रपटांच्या ऑफर्स येणं कमी झालं. नंतर तर तिला चित्रपटही मिळेनासे झाले. बीआर चोपडा यांनीदेखील त्यांच्या भविष्यातील कोणत्याच चित्रपटात विमीला स्थान दिलं नाही. एकीकडे करिअरमध्ये कठीण काळातून जात असताना याच काळात विमी तिचे पती शिव अग्रवाल यांच्यापासून विभक्त झाली. शिव अग्रवाल कोलकाता शहरात मोठे उद्योजक होते. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ही अभिनेत्री जॉली नावाच्या व्यक्तीसोबत राहू लागली. मात्र जॉलीसोबत राहिल्यानंतर ही अभिनेत्री खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त झाली. विमीचे सर्व उद्योगधंदे, टेक्स्टाईल मिल, संपत्ती सगळं काही उद्ध्वस्त झालं. त्यानंतर परिस्थिती एवढी बिघडली की हा तणाव घालवण्यासाठी विमी मद्यपान करू लागली.
अत्यंद दुर्दैवी मृत्यू
विमीची मद्यपानाची ही सवय एवढी वाढली की तिच्या मृत्यूपर्यंत ती कायम राहिली. 1943 साली पंजाबी परिवारात जन्मलेल्या या अभिनेत्रीचा दारुच्या व्यसनामुळे अवघ्या 34 व्या वर्षी मृत्यू झाला. या अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाजवळ आपले असे कोणीही नव्हते, असे म्हटले जाते.
हेही वाचा :