Bollywood Actress Says About Her Wedding: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) प्रोफेशनल लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. खासकरुन असा अभिनेता किंवा अभिनेत्री ज्यांचं कुणासोबत अफेअर (Bollywood Stars Affairs) सुरू आहे किंवा वयाची 40 पार केल्यानंतरही जे अजूनही अविवाहीत आहेत. अनेकजण अशा सेलिब्रिटींबाबत जाणून घेण्यासाठी एक्सायटेड असतात. इंडस्ट्रीमध्ये सलमान खान (Salman Khan), करण जोहर (Karan Johar) पासून सुष्मिता सेनपर्यंत (Sushmita Sen) अनेक सेलिब्रिटींनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. अशातच आता या यादीत आणखी एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. या अभिनेत्रीनं वयाची चाळीशी कधीच ओलांडली असून सध्या तिचं वर 47 वर्ष आहे. अशातच वयाच्या पन्नाशीच्या जवळ येऊनही ही अभिनेत्री लग्नापासून पळ काढले. यामागचं कारणंही अभिनेत्रीनं सांगितलं आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेत्री (Divya Dutta) आहे. ही अभिनेत्री वयाच्या 47व्या वर्षी अविवाहित आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, आता अभिनेत्रीनं थेटच सांगितलंय की, तिला मुळी लग्नच करायचं नाही. तसेच, या निर्णयामागचं कारणंही अभिनेत्रीनं सांगितलं आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना दिव्या दत्तानं (Divya Dutta Interview) आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं. तसेच, लग्न न करण्याच्या कारणांबाबत खुलासाही केला. मुलाखतीवेळी अभिनेत्रीला जेव्हा विचारण्यात आलं की, आतापर्यंत लग्न का नाही केलं? त्यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, "मला असं वाटतं की, जोपर्यंत मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत लग्न करुच नये. चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःची काळजी घ्या. माझ्याकडे अनेक पुरूष आजही आकर्षित होतात आणि मी हे अटेंन्शन एन्जॉय करते. पण, नातं तेव्या खुलतं, जेव्हा तुम्ही एखाद्याशी मनापासून जोडले जाता."
अभिनेत्रीनं पुढे म्हटलंय की, "मला लग्न करायचं नाही, पण मला एका जोडीदाराची गरज आहे, ज्याच्यासोबत मी प्रवास करू शकेल. जर असं कुणी नसेल, तरीसुद्धा मी खूश आहे. माझ्या एका मित्रानं मला विचारलं की, "तू सिंगल का आहेस? तू सुंदर आहेस, अट्रॅक्टिव आहेस, केअरिंग आहेस...", याचं उत्तर देताना मी तिला म्हटलं की, "मला वाटतं की, खरंच योग्य आहे."
दिव्या दत्ता पुढे म्हणते की, "आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक समस्या अशी येते, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा तुम्ही बाहेरून तुमची पूर्णता शोधता, ज्याची गरज नसते. तुमच्या आयुष्यात जोडीदार आल्यावरच तुम्ही पूर्ण व्हाल, असं काही नाही. माझाही हा गैरसमज होता. मी माझं हृदय हातात घेऊन फिरायचे, पण आता नाही."
दरम्यान, दिव्या दत्तानं अनेक चित्रपटांमध्ये तिनं उत्कृष्ट अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. यासोबतच, लाखो लोक तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. दिव्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, दिव्या शेवटी विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती अर्जुन रामपालसोबत 'नास्तिक' मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :