मुंबई: देशभरात सध्या राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मुलासमोरच पत्नीवर धारदार शस्त्राने तब्बल 15 वेळा सपासप वार करून खून केल्याची (Mumbai Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये ही घटना घडली आहे. गौरी शिरसाट (वय 34) असं मृत महिलेचे नाव आहे. तर गणेश शिरसाट असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. आरोपी गणेश शिरसाट आणि मृत गौरी हे दोघेही या जय आंबे परिसरात भाड्याने राहत होते. आरोपी गणेश शिरसाट याची नोकरी गेल्यामुळे तो घरीच होता. तर घर चालवण्यासाठी मृत गौरी नर्स म्हणून काम करत होती. घर चालवण्यासाठी ती काम करत होती, या दोघांना एक दिव्यांग मुलगा आहे. या मुलासमोरच आरोपीने आपल्या पत्नीवर वार करून तिला संपवलं आहे.
चाकूने 10 ते 15 वार करून हत्या
बुधवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास गणेश आणि गौरीमध्ये मोठं भांडण झालं. गणेश पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात गणेशनं आपल्या दिव्यांग मुलांच्या समोर पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने 10 ते 15 वार करून तिची हत्या केली. संतापाच्या भरात त्याने बायकोची हत्या केली काही वेळानंतर गणेश भानावर आला. आपल्या हातून काय घडलं हे त्याला समजल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर गणेशने आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारी राहणाऱ्या महिलेनं हा सगळा प्रकार पाहिला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी गणेश शिरसाटला ताब्यात घेतलं. गौरीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
मुलाच्या डोळ्यादेखत हत्या करुन स्वत:चा हात कापला
कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतः वर वार केल्याची घटना घडली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आहेत. पतीने लहान मुलाच्या डोळ्यादेखत हत्या करुन स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नी झोपेत असताना पत्नीचा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. दोघांना 8 आणि 2 वर्षांची दोन मुले असून आठ वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. पतीने आपल्या मतिमंद मुलांच्या समोर पत्नीच डोक भिंतीवर आपटून तसेच चाकूने 10 ते 15 वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी पती गणेश शिरसाट याने स्वतः आपला हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी गणेश शिरसाट हा बायकोवर चरित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.