Lawrence Bishnoi On Sidhu Moosewala: 2022 मध्ये घडलेल्या एका घटनेनं दिवसाढवळ्या पंजाब इंडस्ट्री पुरती हादरून गेलेली. पंजाबमधील मानसामधील जवाहरके गावात गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. कुणाला काही कळायच्या आतच वाऱ्यासारखी बातमी पसरली की, तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अख्खं पंजाब सुन्न झालं. या हत्येनं देशभरात खळबळ माजलेली. त्यानंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येची (Sidhu Moosewala Murder Case) जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार (Lawrence Bishnoi And Goldie Brar) यांच्या गँगनं स्विकारली.
या घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतरही आजही त्या जखमा सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांच्या, पंजाबमधील (Punjab) लोकांच्या आणि सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) चाहत्यांचा मनात ताज्या आहेत. या प्रकरणाबाबत मुसेवाला कुटुंबीयांसोबतच चाहत्यांच्या मनातही शेकडो प्रश्नांनी घर केलं आहे. अशातच आता प्रश्न आहे की, बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगनं सिद्धू मूसेवालाची खरोखरच हत्या केली का? जर केली असेल, तर का केली? 28 वर्षांच्या सिद्धूसोबत त्यांची दुश्मनी का होती? असे असंख्य प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पण, नुकत्याच समोर आलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये यापैकी काही प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत.
बुधवारी, 11 जून 2025 रोजी, सिद्धू मूसेवालाच्या वाढदिवसानिमित्त, बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री 'द किलिंग कॉल' प्रदर्शित करण्यात आली. दरम्यान, सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनीही या डॉक्युमेंट्रीवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, मानसा न्यायालयानं डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्यास नकार दिला. आता बीबीसीनं ही डॉक्युमेंट्री यूट्यूबवर प्रदर्शित केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये सिद्धू मूसेवालाच्या हत्येशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही हत्या का झाली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सिद्धू कॅनडामध्ये असतानापासून लॉरेन्सच्या संपर्कात होता; डॉक्युमेंट्रीमध्ये खळबळजनक दावा
'द किलिंग कॉल'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सिद्धू मूसेवाला आणि लॉरेन्स बिश्नोई एकमेकांच्या संपर्कात होते. तेही जेव्हापासून तो कॅनडामध्ये राहत होता आणि त्याच्या सिंगिंग कारकिर्दीला सुरुवात करत होता तेव्हापासून. असं सांगितलं जातं की, सिद्धू मूसेवाला यांचे भारतात परतल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या विरोधकांशी असलेले संबंध अधिक घट्ट झाले आणि कुठेतरी हेच त्याच्या हत्येचं कारण बनलं.
डॉक्युमेंट्रीमध्ये गोल्डी ब्रारची ऑडियो रेकॉर्डिंग
'द किलिंग कॉल' डॉक्युमेंट्रीमध्ये सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा सह-आरोपी आणि फरार गँगस्टर गोल्डी ब्रारनं ऑडिओ रेकॉर्डिंगमार्फत घटनेचा संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. या एपिसोडमध्ये पत्रकार इशलीन कौर यांनी सांगितलंय की, सिद्धू मुसेवाला कॅनडात राहत असल्यापासूनच लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होता. त्यांनी हेसुद्धा सांगितलंय की, बिश्नोईचा दुश्मन बंबीहा गँगसोबतही सिद्धू मुसेवालानं मैत्री केलेली.
लॉरेन्सनं नकार दिल्यानंतरही सिद्धू मुसेवाला बंबीहाच्या कार्यक्रमाला उपस्थित
डॉक्युमेंट्रीच्या भागात सिद्धू आणि लॉरेन्समधील संघर्षाचं मुख्य कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. म्युझिक इंडस्ट्रीतील एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनदीप धालीवाल हा एक गुंड होता, जो बंबीहाच्या टोळीचा भाग होता. त्यानं एक कब्बडी सामन्याचं आयोजन केलेलं. सिद्धू मुसेवाला त्यात परफॉर्म करणार होता. तसं आमंत्रण त्याला धाडण्यात आलेलं. पण, लॉरेन्स बिश्नोईनं सिद्धूला तिथे न जाण्याबाबत बजावलं. पण, सिद्धूनं अजिबात ऐकलं नाही आणि त्या कब्बडी सामन्यांसाठी हजेरी लावली.
लॉरेन्स आणि सिद्धू यांच्यातील पहिला वाद कब्बडी सामन्यावेळी झालेला
गोल्डी ब्रारनं एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, "पहिला वाद भागो माजरामध्ये कबड्डी खेळावरून झाला. आमचे प्रतिस्पर्धी इथलेच आहेत. तो आमच्या शत्रूला प्रोत्साहन देत होता. त्यानंतर लॉरेन्स आणि इतर सिद्धूवर चिडलेले. त्यांनी सिद्धूला धमकी दिली आणि सांगितलं की, ते त्याला सोडणार नाहीत. पण, अहंकारात सिद्धू मुसेवालानं अशा अनेक चुका केल्या, ज्या लॉरेन्स बिश्नोई माफ करू शकला नाही."
विक्कीची हत्या, लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आला सिद्धू मुसेवाला
जवळपास दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये विक्की मिड्दुखेड़ाची हत्या करण्यात आलेली. तो लॉरेन्स आणि गोल्डी दोघांचा जवळचा मित्र होता. कथितरित्या बंबीहा गँगनं विक्कीच्या हत्येची जबाबदारी स्विकारलेली. पण, यामुळे सिद्धू्च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. कारण, सिद्धूनं लॉरेन्सचा नकार असतानाही बंबीहा गँगसोबत मैत्री केलेली. ज्यावेळी हत्येची चार्जशीट दाखल करण्यात आली, त्यावेळी सिद्धूचा जवळचा सहकारी आणि मित्र शगनप्रीत आणि मित्र शगनप्रीत सिंहनं हत्येचा कट रचल्याचं समोर आलं.
सगळ्यांनाच माहीत होतं विक्कीच्या हत्येत सिद्धूचाही हात होता : गोल्डी ब्रार
गोल्डी ब्रारनं ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये पुढे म्हटलं की, "विक्कीचा मृत्यू झाला, त्यात प्रत्येकाला सिद्धू मुसेवालाची भूमिका माहीत होती. पोलिसांनाही माहीत होतं. एवढंच काय तर, पत्रकारांनाही माहीत होतं. तो आपल्या राजकीय प्रभावाचा, पैशाचा वापर करून आपल्या शत्रूंना, आमच्या भावाला मारणाऱ्यांना मदत करत होता. त्यानं केलेल्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा होती. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यानं तुरुंगात जायला हवं होतं, पण आमचं कोणीच ऐकलं नाही. म्हणून आम्ही ते स्वतःचं करण्याता निर्णय घेतला.
एकतर तो किंवा आम्ही, बस्स फक्त एवढंच : गोल्डी ब्रार
डॉक्युमेंट्रीमधल्या रेकॉर्डींगच्या शेवटी गोल्डी ब्रार म्हणला की, "आमच्याकडे त्याला मारण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही रस्ता नव्हता. त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागणार होती. एकतर तो किंवा आम्ही, बस्स एवढंच...."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Housefull 5 Box Office Collection Day 6: 'हाऊसफुल 5' हिट की, फ्लॉप? 6 दिवसांच्या कलेक्शननंतर पोलखोल