प्रसिद्ध अभिनेत्री  मीनू मुमताज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या कॅनडामध्ये राहात होत्या. प्रसिद्ध कॉमेडियन महमूद यांच्या मीनू बहिण आहेत.

26 एप्रिल 1942 रोजी मीनू यांचा जन्म झाला. मीनू मुमताज यांनी बालपणी डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. देविका रानी यांनी मीनू यांना बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून काम करण्याची संधी दिली.  मीनू मुमताज यांनी  'घर घर में दीवाली' या चित्रपटमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 1955 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये  मीनू मुमताज यांनी गावामध्ये राहणाऱ्या एका नृत्यांगनाची भूमिका साकारली होती. 'सखी हातिम' या चित्रपटामुळे मीनू यांना विशेष लोकप्रियता मिळाली.  

Theaters Reopen : 'नमितो तुजला कलेश्वरा' ही नांदी रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत दिग्गज

मीनू यांनी गुरु दत्त यांच्या ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम' या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच  ताज महल, घूंघट, इंसान जाग उठा, घर बसाके देखो, गजल, अलीबाबा, अलादीन, धर्मपुत्र  आणि जहांआरा या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. मीनू यांनी दिग्दर्शक सैयद अली अकबर यांच्यासोबत 1963 मध्ये लग्न केले.  

तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर घेऊन येत आहेत 'कशा असतात या बायका' हा लघुपट

मीनू मुमताज यांचे खरे नाव  मालिकाउन्निसा अली असे आहे. जेव्हा त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अभिनेत्री  मीना कुमारी यांनी त्यांचे नाव बदलून  मीनू मुमताज केले.  

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचा आजी घेणार आज निरोप, घरातील सदस्यांना अश्रू अनावर

'BUNTY AUR BABLI 2': 'बंटी और बबली-2' च्या फर्स्ट लूकची चर्चा; सैफ-राणीचा भन्नाट लूक

Urfi Javed : 'तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते' उर्फीने सांगितला सेटवरील धक्कादायक अनुभव