Bipasha Basu on Mrunal Thakur : सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळे व्हिडीओ ट्रेडिंगला असलेले पाहायला मिळतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. दरम्यान, सध्या सन ऑफ सरदार 2 फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनलाय. मृणाल ठाकूर तिच्या पहिल्या टीव्ही शोसाठी काम करत होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. त्यावेळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने बिपाशाच्या शरीराबद्दल वाईट पद्धतीने कमेंट केली होती. दरम्यान, याच तिच्या वक्तव्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू भडकलेली पाहायला मिळत आहे. तिने मृणाल ठाकूरच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मृणालच्या कमेंटनंतर बिपाशा बासूची पहिली प्रतिक्रिया
मृणाल ठाकुरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नुकतीच बिपाशा बासूने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये अभिनेत्री बिपाशा बासूने लिहिलं की, – "मजबूत महिला एकमेकींना पुढे नेतात. सर्व सुंदर महिलांनी आपल्या स्नायूंना मजबूत करावे. आपण सगळ्यांनी मजबूत व्हायला हवं. स्नायू तुमच्या शरीराला आणि मेंदूला चांगलं बनवतात. महिलांनी मजबूत किंवा शारीरिकदृष्ट्या बलवान नसावं हा जुनाट समज काढून टाका." मात्र, या दरम्यान बिपाशाने कुणाचंही नाव घेतलं नाही. पण मृणालने एका अभिनेत्रीच्या शरीरावर टिप्पणी केल्यानंतरच बिपाशाने ही पोस्ट टाकली आहे.
बिपाशा बासूबद्दल काय म्हणाली होती मृणाल ठाकूर?
खरं तर, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मृणालच्या को-स्टारने तिला सांगितलं की त्याला बिपाशा आवडते, तो तिचा आदर करतो. यावर मृणाल उत्तर देते – "तुला अशा मुलीशी लग्न करायचं आहे का जी पुरुषासारखी दिसते? जा, कर बिपाशाशी लग्न. पण तिचे स्नायू पुरुषासारखे आहेत." यानंतर मृणाल स्वतःची बिपाशाशी तुलना करत म्हणते – "मी बिपाशापेक्षा खूपच चांगली दिसते, ओके." अभिनेत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिपाशाचे फॅन्स मृणालला ट्रोल करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतीच मृणाल सन ऑफ सरदार 2 मध्ये दिसली, तर बिपाशा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे आणि लवकरच कमबॅक करणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या