Marathi Actor Shashank Ketkar Shares Video Of Police Van: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतो. शशांक नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. आजवर शशांकनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल अनेकदा प्रशासनानं घेतली आहे. आता शशांकचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 


अभिनेता शशांक केतकरनं पोलिसांच्या गाडीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह शशांक केतकरनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅनला चलान लागतं का? आणि लागलं तर ते भरलं जातं का? त्यांनी सिग्नल मोडला तर तर चालतं का? असे एक नाहीतर, अनेक प्रश्न शशांक केतकरनं उपस्थित केले आहेत.  


शशांक केतकर नेमकं काय म्हणाला? 


मराठमोळा अभिनेता बोलताना म्हणाला की, "आरटीओचे नियम हे सगळ्यांना सारखेच असतात आणि न्यायदेवतेपुढे कोणीही लहान-मोठ नसते, हे गृहीत धरून मी हा व्हिडीओ शूट करत आहे" पुढे तो व्हिडीओत पोलिसांची गाडी दाखवून शशांक केतकर म्हणतो की, "आता ही ऑन ड्युटी पोलीस व्हॅन यावर नंबरप्लेट दिसत नाहीय, उजवीकडे, डावीकडे, वर-खाली कुठेच नंबरप्लेट नाहीय. बिचारी मोडकळीला आलेली ही गाडी आपले पोलीस बांधव चालवत आहेत, पण नंबरप्लेट काही दिसत नाहीय..."






"उजवीकडे नंबरप्लेट आहे. पण दुर्दैवानं गंजलेली नंबरप्लेट आहे... आपल्या गाड्यांच्या नंबरप्लेट जर अशा असतील किंवा फॅन्सी असतील, खरंतर त्या असूच नयेत. मी अगदीच त्याविरोधात आहे. पण अशा गंजलेल्या नंबरप्लेट आपल्या असतील तर त्याला चलान लागतं, ज्याचे आपल्याला पैसे भरावे लागतात. माझा प्रश्न हा आहे, या ऑन ड्युटी व्हॅन्सनासुद्धा चलान लागतं का? यांना कोर्ट किंवा ऑनलाईन चलान भरावं लागता का?", असं म्हणत शशांक केतकरनं प्रश्न उपस्थित केले आहेत.  


व्हिडीओ शेअर करताना शशांक केतकरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतोय... शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅनला चलान लागतं का? आणि लागलं तर ते भरलं जातं का? त्यांनी सिग्नल मोडला तर तर चालतं का? माननीय गडकरी साहेबांच्याच गाडीला एकदा चलान भरावं लागल्याचं मी ऐकलं आहे; पण सरसकट सगळ्या नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं का?"


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathi Actor Shashank Ketkar Video: 'कंटाळा आणि निष्काळजीपणा, आम्हाला मरायची इच्छा नाही...'; शशांक केतकरकडून संताप व्यक्त, व्हिडीओ शेअर करत आगपाखड