Shilpa Shetty Raj Kundra Accused Of Fraud Rs 60 Crores: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 ते 2023 दरम्यान व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 60 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका व्यावसायिकाची 60 कोटींहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 ते 2023 दरम्यान व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीनं फसवल्याचा आरोप उद्योगपती दीपक कोठारींनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एफआयआर दाखल  केला आहे.

उद्योगपती दीपक कोठारींचे आरोप नेमके काय? 

2015 मध्ये कोठारीची भेट राजेश आर्य या एजंटशी झाली. त्यानं त्याला शिल्पा-राजच्या Best Deal TV Pvt. Ltd. शी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल सांगितलं. कंपनीनं असा दावा केला होता की, ते फॅशनपासून ते हेल्थ प्रोडक्टपर्यंत सर्व काही विकणारा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत. आर्यनं 12 टक्के वार्षिक व्याजदरानं 75 कोटी रुपयांचं कर्ज मागितलं. त्यावेळी शिल्पाचे कंपनीत 87% पेक्षा जास्त शेअर्स होते.

सुरुवातीला कर्ज देण्याची चर्चा होती, पण टॅक्सच्या कराच्या बहाण्यानं 'गुंतवणूक' करण्याचं सुचवण्यात आलं. एका हॉटेलमध्ये बैठक झाली, त्यात वचन देण्यात आलं की, टॅक्सही कमी लागेल, व्याजही मिळेल, पैसे वेळेवर परत केले जातील. यावर विश्वास ठेवून कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये सुमारे 31.95 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला. 

टॅक्सचा प्रश्न काही सुटला नाही, तरीही सप्टेंबर 2015 मध्ये दुसरा करार झाला आणि जुलै 2015 ते मार्च 2016 दरम्यान आणखी 28.54 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. एकूण 60 कोटी 48 लाख 98 हजार 700 रुपये भरण्यात आले आणि त्याव्यतिरिक्त 3 लाख 19 हजार 500 रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरण्यात आले. त्या बदल्यात एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टीनं वैयक्तिक हमीही दिली.

सप्टेंबर 2016 मध्ये शिल्पानं अचानक डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला. काही वेळातच, कंपनीविरुद्ध 1.28 कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला सुरू असल्याचं कळलं, ज्याची कोठारींना माहितीही देण्यात आली नाही. पैसे परत मागितले असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली, असा आरोपही दीपक कोठारींनी केला आहे. 

शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी फेटाळले सर्व आरोप 

शिल्पा आणि राज यांच्या वकिलांनी मात्र हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, मुंबईनं (NCLT) या संदर्भात आधीच निर्णय दिला आहे. त्यांनी EOW ला सर्व कागदपत्रे आणि तपशील दिल्याचंही सांगितले आहे. या प्रकरणामुळे शिल्पा-राज यांचं नाव पुन्हा एकदा वादात आलं असून, पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीवर सर्वांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shashank Ketkar Shares Video Of Police Van: शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅनला चलान लागतं का? मराठमोळ्या अभिनेत्याचा प्रश्न, प्रशासनाकडून उत्तर मिळणार?