Adnaan Shaikh And His Wife Ayesha Shaikh Welcome Baby Boy: 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) फेम अदनान शेखनं (Adnaan Shaikh) सप्टेंबर 2024 मध्ये आयेशा शेख (Ayesha Shaikh) (रिद्धी जाधव) सोबत लग्न केलं. लग्नानंतर 9 महिन्यांतच अदनानच्या घरात पाळणा हलला आहे. अदनान शेख आणि त्याची पत्नी आयेशा शेखनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांना पुत्ररत्न झालं आहे. दोघांनीही सोशल मिडिया हँडलवरुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

अदनान शेखनं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये अनेक स्लाइड्स आहेत. पहिल्या स्लाईडमध्ये अदनाननं त्याच्या बाळासोबतचा फोटो कॅरिकेचर स्वरुपात पोस्ट केला आहे. तर, इतर स्लाइड्समध्ये क्युट मेसेज लिहिला आहे. तसेच, याच मेसेजमध्ये त्यांना मुलगा झाल्याची गूड न्यूज शेअर केली आहे. दरम्यान, अद्याप अदनाननं बाळाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. 

मुलासाठी मागितले आशीर्वाद

अदनाननं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "अल्लाहनं आम्हाला आमच्या गोंडस बाळाच्या स्वरुपात आशीर्वाद दिला आहे. मी आता एवढा खूश आहे की, मला आपल्या भावना व्यक्त करणं शक्यच नाहीये. मी खूपच इमोशनल झालोय आणि तुम्हा सर्वांचा आभारी आहे. माझ्या बाळाला आशीर्वाद द्या... #अल्हम्दुलिल्लाह #बेबीबॉय"  

बिग बॉस ओटीटी 3' फेम अदनान शेख कोण? 

अदनान शेख प्रसिद्ध सोशल मिडिया स्टार, इन्फ्लुएन्सर, मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये अदनान स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. याव्यतिरिक्त 'ऐस ऑफ स्पेस 2'या शोमध्येही अदनान दिसला होता. अदनान मूळचा मुंबईचा आहे आणि तो 'टीम07'चा हिस्सा होता. अदनान आपल्या बोल्ड पर्सनालिटीसाठी ओळखला जातो. 'बिग बॉस ओटीटी 3'मुळे त्याला स्टारडम मिळाला आहे. आतापर्यंत अदनानच्या इन्स्टाग्राम हँडलवर 19 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

अदनानसोबत लग्नासाठी पत्नीनं बदलेला धर्म 

अदनानची पत्नी आयशाबाबत काही दिवसांपूर्वी खुलासा करण्यात आलेला की, तिचं खरं नाव रिद्धी जाधव होतं. अदनानची बहीण इफ्फतनंही सांगितलेलं की, आयशा हिंदू होती, त्यानंतर अदनानसोबत लग्न करण्यासाठी तिनं स्वतःचा धर्म बदलला. हिंदू धर्मातून तिनं इस्लाम धर्म स्विकारला. आयशा इंडिगोमध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती. पण, लग्नानंतर तिनं नोकरी सोडली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ramayana First Glimpse Review: 'बॉक्स ऑफिसवर तुफान येतंय...'; रणबीर कपूरच्या 'रामायण'चा फर्स्ट रिव्यू आऊट, VIDEO