Ramayana First Glimpse Review: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपट 'रामायण'ची (Ramayana Movie) अनेकजण उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. अशातच आता प्रेक्षकांची उत्सुकता लवकरच संपणार आहे. 'रामायण' रिलीज होण्यास बराच अवधी असला तरिसुद्धा येत्या 9 तारखेला बहुप्रतिक्षित सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा परिस्थितीत रणबीर कपूरच्या या सिनेमाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. 'रामायण'ची पहिली झलक कशी आहे? याबाबत आता फर्स्ट रिव्यू (Ramayana Movie First Review) समोर आला आहे. 

Continues below advertisement

फिल्म क्रिटिक तरण आदर्श (Film Critic Taran Adarsh) यांनी 'रामायण'ची पहिली झलक पाहिली आणि त्यांनी ट्विटरवर याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली. त्यांनी सांगितलं की, 7 मिनिटांचा हा लॉन्च टीझर खूपच शानदार आहे. ट्विटवर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तरण आदर्श यांनी 'रामायण'बाबत लिहिलं आहे की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान घेऊन येणार आहे.  

रणबीरचा 'रामायण' बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार? 

फिल्म क्रिटिक तरण आदर्श यांनी लिहिलंय की, "जय श्री राम, आताच मोस्ट अवेटेड महाकाव्य 'रामायण'ची पहिली झलक आणि 7 मिनिटांचा व्हिजन शोरील पाहिला. टाईमलेस सागाची ही पहिली झलक तुम्हा सर्वांना हैराण करेल. स्ट्रॉन्ग फीलिंग आहे की, 'रामायण' फक्त आजचा सिनेमा नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान येणार आहे. या ऐतिहासिक प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी दूरदर्शी निर्माते नमित मल्होत्रा यांना खूप खूप शुभेच्छा." 

Continues below advertisement

"अपेक्षा आहे, आदिपुरुषसारखा ब्लंडर नसेल..." 

'रामायण' फर्स्ट रिव्यू पाहिल्यानंतर चाहते 'आदिपुरूष'चं नाव घेत आपलं मत मांडत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "प्रत्येक पात्रासाठी उत्तम आणि योग्य कलाकारांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आशा आहे की, ते आदिपुरुषप्रमाणे भावनांना ठेस पोहोचवल्याशिवाय कहाणी योग्य पद्धतीनं मांडतील." दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली आहे की, "ते हे ब्ल्यू स्क्रिनवर शूट करत आहेत, अपेक्षा आहे की, आदिपुरूषसारखं काहीच नसेल..." याव्यतिरिक्त एका व्यक्तीनं म्हटलंय की, "अपेक्षा आहे की, हे आदिपुरुषसारखा ब्लंडर नसेल. रणबीर कपूरला शुभेच्छा..." 

3 जुलैला 9 शहरांमध्ये लॉन्च होणार 'रामायण'

'रामायण'चा पहिला युनिट 3 जुलै रोजी देशातील 9 मोठ्या शहरांमध्ये लॉन्च केला जाणार आहे. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोच्चीचा समावेश आहे. फिल्मची रिलीज डेट अजून समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, फिल्मचा पहिला पार्ट दिवाशी 2026 मध्ये आणि दुसरा पार्ट दिवाशी 2027 रोजी रिलीज केला जाणार आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vikrant Massey On Son Vardaan Religion: विक्रांत मेस्सीचा मुलगा ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन; वरदानच्या धर्माबाबत अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय!