Hera Pheri 3 Star Cast Fees: 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3 Movie) ची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आगामी चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. खरंतर, परेश रावल (Paresh Rawal) अचानक चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे अक्षय कुमारनं (Akshay Kumar) ज्येष्ठ अभिनेत्याविरुद्ध 25 कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता. दोन दिग्गजांमधील या वादानं संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. दरम्यान, नंतर दोन्ही कलाकारांमधलं हे प्रकरण मिटलं असून आता परेश रावल यांच्या 'हेरा फेरी 3' मध्ये परतले आहेत.
त्याचबरोबर, 'हेरा फेरी 3'च्या त्रिकुटाला (अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी) पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच आता 'हेरा फेरी 3'साठी अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) घेतलेल्या फीबाबत चर्चा रंगली आहे.
'हेरा फेरी 3'साठी परेश रावल यांनी किती पैसे घेतले?
आम्ही तुम्हाला सांगतो की, सुपरहिट फ्रँचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागासाठी अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी त्यांचं मानधन प्रचंड वाढवलं आहे.
'हेरा फेरी 3'मधल्या भूमिकेसाठी परेश रावल यांना 15 कोटी रुपये देण्यात येत असल्याच्या अफवा आहेत. यापूर्वी त्यांना 11 लाख रुपये सायनिंग अमाउंट देण्यात आली होती. कायदेशीर कारवाई आणि त्यानंतर रंगलेल्या वादावादीच्या नाटकानंतर आता परेश रावल यांची वापसी झाली असून त्यांना सायनिंग अमाउंट परत करण्यात आली आहे.
'हेरा फेरी 3' साठी अक्षय कुमारला किती पैसे मिळाले?
दुसरीकडे, अक्षय कुमारला सर्वाधिक फायदा झाला आहे. कारण त्याला 20 कोटी रुपयांची मोठी फी मिळत असल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्यानं नफ्याचा करारही केला आहे. जर दोन्ही एकत्र केले तर त्याला 60 कोटी ते 145 कोटी रुपये मिळू शकतात, जे तो सध्या प्रत्येक चित्रपटासाठी घेतो.
'हेरा फेरी 3'साठी सुनील शेट्टीला किती पैसे मिळतात?
सुनील शेट्टीचं चित्रपटासाठीचं मानधन अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. पण, टाईम्स नाऊनुसार, ते 2 ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, परेश रावल यांनी प्रियदर्शनच्या 'हेरा फेरी 3' मध्ये त्याच्या पुनरागमनाची पुष्टी केली आहे, असं म्हटलं आहे की, चित्रपटाचं काम सुरू आहे. पण 'ते योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी' त्यांना वेळ हवा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'तेव्हा मला डॉ. श्रीराम लागूंनी 10 हजारांची मदत केलेली...'; आमिर खाननं सांगितला Untold किस्सा