मुंबई : फिल्म इंडस्ट्री म्हटलं की, झगमगती लाईफ स्टाईल. काहींना या झगमगत्या लाईफ स्टाईलबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते, 'दुरून डोंगर साजरे' असं म्हणत सर्वसामान्य माणसं यापासून दूर पळतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर येण्याचा कधी विचारही केला नव्हता, पण असे काही कलाकार सध्या फिल्म इंडस्ट्री गाजवत आहेत. साऊथच्या अशाच एका सुपरस्टारबद्दल जाणून घ्या.


फक्त 736 रुपये महिना पगारावर नोकरी


दक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि कलाकारांनी देशातच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.  साऊथ सिनेमामधील एक सुपरस्टार असा आहे, ज्याने एकेकाळी केवळ 750 रुपये महिना पगारावर काम केलं, पण आज तो 350 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. ही कहाणी आहे साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार सूर्या याची. 


अभिनेता होण्याची अजिबात नव्हती इच्छा


सूपरस्टार अभिनेता सूर्या याला अभिनेता होण्याची अजिबात आवड नव्हती. सूर्याचे वडील शिवकुमार साऊथ सिनेमामधील दिग्गज अभिनेते होते. पण सूर्याला चित्रपटसृष्टीत येण्यात अजिबात रस नव्हता. पदवी शिक्षण पूर्ण करून सूर्या एकदा कापड कारखान्यात सामान्य कामगार म्हणून काम करत होता आणि तेव्हा त्याचा मासिक पगार फक्त 736 रुपये होता. उद्योगपती होण्याचं सूर्याचं स्वप्न होतं.


दिग्दर्शकाच्या सल्ल्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण


सूर्या एका कापड कारखान्यात काम करत असताना एका दिग्दर्शकाच्या सल्ल्याने त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून त्याने नाव बदलून चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली आणि आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं. मुळात सूर्याला आधीही 1995 मध्ये चित्रपटात मूख्य भूमिकेसाठी ऑफर आली होती, पण ती ऑफर त्याने नाकारली. त्यानंतर 1997 मध्ये त्याने दिग्दर्शकाच्या सल्ल्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.


20 वर्षांचा असताना चित्रपटाची ऑफर नाकारली


सोरराई पोट्टू ते सिंघम यासारख्या चित्रपटांत दमदार ॲक्शन दाखवणाऱ्या या सूपरस्टारचे करोडो चाहते आहेत. मात्र अभिनेता शिवकुमारचा मुलगा सूर्याला चित्रपटात यायचंच नव्हतं. सूर्या अवघ्या 20 वर्षांचा असताना त्याला 'असई' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याला अभिनेता व्हायचं नव्हतं म्हणून त्यानं ही ऑफर नाकारली.


वडिलांपासून वेगळी ओळख निर्माण करायची होती


सूर्याला वडिलांपासून वेगळी अशी स्वतःची ओळख हवी होती, त्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीमध्ये यायचं नव्हतं. याबाबत एका मुलाखतीदरम्यान अभिनेता सूर्याने स्वतः सांगितलं होतं की, जेव्हा मी शिकत होतो तेव्हा माझे वडील म्हणायचे की, आधी पदवी शिक्षण पूर्ण कर आणि त्यानंतर मार्ग निवड, असं  वडील शिवकुमार यांनी त्याला सांगितलं होतं


कपड्याच्या कारखान्यात नोकरी


सूर्याने सुरुवातीला गारमेंटच्या फॅक्टरी 736 रुपये पगारावर कपड्याच्या कारखान्यात सामान्य कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. सूर्याचे खरं नाव शिवकुमार सर्वानन आहे, पण दिग्दर्शक मणिरत्नम यांनी त्याला सूर्या हे नाव दिलं. यानंतर सूर्याने इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि एकामागोमाग एक हिट चित्रपट देत इंडस्ट्रीत आपली छाप पाडली. 


अभिनयासह निर्मिती आणि पार्श्वगायनातही नाव


सूर्याने अभिनयासोबतच निर्मिती आणि पार्श्वगायनातही नाव कमावलं आहे. 2006 मध्ये सूर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केलं आणि त्यांना दोन मुलेही आहेत. सूर्या हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अभिनेता सूर्याची एकूण संपत्ती 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.


कांगुवा चित्रपटाची प्रतीक्षा


अभिनेता सूर्या लवकरच आगामी कांगुवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kanguva : सूर्या आणि बॉबी देओलच्या 'कंगुवा' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा, आलिया भटच्या या चित्रपटासोबत क्लॅश होणार