Chota Pudhari Ghanshyam Darode Share Haldi Ceremony Video: नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) आपली लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात सूरज चव्हाणचा विवाहसोहळा (Suraj Chavan Wedding Ceremony) पार पडलेला. सूरज चव्हाणच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. अशातच आता सूरज चव्हाण पाठोपाठ आणखी 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकाची लगीनघाई सुरू झाल्याचं बोललं जात आहे. सूरजसोबत बिग बॉस मराठीच्या घरात असलेला स्पर्धक घनःश्याम दरोडे (Ghanshyam Darode) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. घनःश्यामनं त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या हळदीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss) पाचव्या सीझनचा स्पर्धक छोटा पुढारी (Chota Pudhari) म्हणजेच, घनःश्याम घनश्याम दरोडे सध्या चर्चेत आहे. त्याची लगीनघाई सुरू आहे. सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये छोटा पुढारी पाटावर येऊन बसतो आणि त्याची आई तिथे ठेवलेली हळद त्याला लावते. घनःश्यामच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत आहेत. काहींनी घनःश्यामचं कौतुक केलंय, तर काहींनी घनःश्याम दरवडेला ट्रोलही केलं आहे.
व्हिडीओ शेअर करताना घनःश्यामनं काय म्हटलंय?
घनःश्याम दरोडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला हळद लागताना दिसतेय. हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत घनःश्यामनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "नवरदेव झालो ना राव... हळद लागली एकदाची... माझं पण ठरलं बरका... यायला लागतंय", असं लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या व्हिडीओच्या पुढे आणखी एक व्हिडीओ आहे. त्यामध्ये घनःश्याम लग्नाच्या कपड्यांच्या दुकानात दिसतोय.
घनःश्याम दरोडेनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "किती फुटाची आहे मुलगी...?", दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "बाळ लवकरच मंडपात येणार आता", आणखी एका युजरनं कमेंट सेक्शनमध्ये "बालविवाह करू नकोस रे घनश्या...", असं म्हटलं आहे. तसेच, अनेकांनी, 'बालविवाहची केस होईल बाबा...', 'बालविवाह करणं कायद्यानं गुन्हा आहे...', असंही लिहिलंय.
सूरज चव्हाणच्या लग्नाला उपस्थित न राहिल्याबद्दल घनःश्याम दरोडेनं दिलेलं स्पष्टीकरण
सूरज चव्हाणच्या लग्नाला 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधले अनेक स्पर्धत उपस्थित होते. मात्र, त्यांच्यासोबत घनःश्याम दरोडे दिसला नाही. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. अशातच सर्व चर्चांना पूर्णविराम देत घनःश्यामनं एक व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलेलं.
घनःश्याम म्हणालेला की, "मुळात म्हणजे मला या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता. पण बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत. बरेच जण बोलत आहेत. घनःश्यामजी तुम्ही बऱ्याच प्रश्नावर उत्तरे देतात. कोणी आरोप केले तरीही ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात. मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेला नाही, याचं उत्तर आम्हाला द्या. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या. मित्रांनो, मलाही त्याच्या लग्नाला जायचं होतं. पण खरंच सांगतो, माझे जे दौरे चालू होते, माझा एका मराठी वृत्तवाहिनीसोबत करार झाला आहे. त्यामुळे त्या वृत्तवाहिनीचा शो सोडून मला कुठेही जाता येत नाही. काही शो असतील तर मला ते करतात येतात नाही तर मला ते शो करता येत नाहीत. तीन महिन्यांचं माझं टायप असल्यानं मला कुठे जाता येत नाही. जर महत्वाचे घरातील काही असेल तर मला सुट्टी काढता येते..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :