Dhananjay Powar On Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेचा सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी आपली लग्नगाठ बांधली. सूरजच्या लग्नाच्या तयारीपासून, त्याचं केळवण आणि त्याच्या लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले. त्याचवेळी सूरज चव्हाणच्या नव्या घराचेही फोटो व्हायरल झालेले. उपमुख्यमंत्री अजिददादांनी (Deputy CM Ajit Pawar) सूरज चव्हाणला अगदी राजवाड्यासारखं अलिशान घर बांधून दिलेलं. सूरजच्या लग्नाचे आणि नव्या घराचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले. सूरज चव्हाणच्या लग्नासाठी त्याच्यासोबत 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेले त्याचे सहस्पर्धकही उपस्थित होते. जान्हवी किल्लेकर, कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील, डीपी दादा उपस्थित होते. अशातच आता सोशल मीडियावर डीपीदादा म्हणजेच, धनंजय पोवारनं (Dhananjay Powar) एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये डीपी चिडला असून त्यानं सूरजच्या घरातल्या फर्निचरचा मुद्दा थेट सोशल मीडियावर सांगितलाय. 

Continues below advertisement

सूरज चव्हाणनं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अवघ्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलेलं. त्यानंतर पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवंकोरं अलिशान घर बांधून दिलं. बिग बॉसच्या घरात असतानाच, तुझ्या नव्या घरात सोफासेट मी देणार, असं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, बिझनेसमन धनंजय पोवारनं सूरजला सांगितलेलं. मात्र, सूरजला प्रत्यक्षात दुसरंच कुणीतरी सोफासेट दिला. यावरुन सोशल मीडियावर डीपीदादाला ट्रोल केलं जाऊ लागलं. अशातच आता डीपीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

धनंजयने हा व्हिडीओ शेअर (Dhananjay Powar VIDEO On Suraj Chavan) करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "त्याला बाहेरून सोफा मिळाला त्याने घेतला... पण त्यानं मला ही कॉल केला होता कसं करूया म्हणून... पण त्यानं बाहेर जर सांगितलं होतं, तर ते त्यानं मला कळवलं पाहिजे होतं...  तरी ही त्यानं मला लोकेशन पाठवायला पण वेळ लावला (आदल्या रात्री पाठवलं) जणू आधी मी त्याला हे पण बोललो की, लग्नाची गडबड आहे... तेव्हा 2/3 दिवस जाऊदे, आपण नंतर पाठवू त्यावर पण तो हा बोलला होता... मी 3/4 वेळेस कॉल केले त्याला अड्रेस पाठव, सोफा बघायला येतोस का? किंवा माप सांग काय आहे हॉलचं, हॉलचे फोटोज पाठव... आता मी यापेक्षा जास्त काय बोलू? कदाचित, आज त्याला कोणीतरी जास्त देतं म्हणून मला विसरला का?'

Continues below advertisement

VIDEO मध्ये धनंजय पोवार काय म्हणाला? 

व्हिडीओमध्ये धनंजय पोवार म्हणतोय की, "आजचा विषय, सूरजच्या फर्निचरचा आहे. सूरजला मी सांगितलेलं की, तुझ्या घरात सोफासेट असेल तो मी देणार. सोसायटी फर्निचर देणार. दीड महिन्याअगोदर त्याचा मला फोन आलेला, सोफासेटचं काय करणार? मी त्याला म्हटलं, मी सोफासेट पाठवतोय... तू इकडे येणार आहेस का? तुला कोणता हवा आहे? की, मी माझ्या पद्धतीनं पाठवू? त्यावेळी मी त्याला सांगितलं की, तुझ्या घराचे मला फोटो पाठव, त्यानुसार मॅचिंग सोफासेट मी तुला पाठवून देतो... त्यानंतर दोन-तीन वेळा मी त्याला सांगितलं की, तुझा पत्ता मला पाठवून ठेव, म्हणजे, सोफासेट तयार झाला की, तुझ्या घरी मी डायरेक्ट पाठवून देतो... मी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत त्याच्या घरी जाईपर्यंत त्यानं मला सांगितलं नव्हतं की, त्यानं फर्निचर बाहेरुन घेतलंय... मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं... मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतलेला... आणि आज लोक कमेंट करतायत की, मतांसाठी या माणसानं त्याला फर्निचर देतो म्हणून सांगितलेलं... मी कुठलीही गोष्ट मतांसाठी करेन हे माझ्या रक्तात नाही..."

"आज आम्ही जे काही आहोत, ते स्वतःच्या हिंमतीवर आहोत... त्याला म्हटलं मी देणार होतो तुला... तर तो म्हणाला, "नाही ना... मला हे दादांनी पाठवलं आहे..." मी म्हटलं अरे तू सांगायचं दादांना, मला डीपी दादा देणार आहेत... आणि ह्याचा जाब सूरजला विचारा ना! मला काय विचारताय तुम्ही जाब? मी आजही सोफासेट त्याला द्यायला तयार आहे... माझं त्याच्या भावासोबतही बोलणं झालेलं. कमेंट करताना विचार करायचा... त्याला जर माझ्याकडून नको असेल, त्याला मी काय करू? त्यानं पण आम्हाला किंमत द्यायला पाहिजे. त्यानं स्वतःहून सांगायला पाहिजे. मला का विचारताय तुम्ही? त्यानं मला सांगितलं नाही. लग्नाच्या दिवसापर्यंत त्यानं मला लोकेशन, पत्ता काहीच पाठवलं नाही... आणि आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला कशाला कमेंट करायच्या आहेत?", असं धनंजय पोवारनं पुढे म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Janhavi Killekar On Suraj Chavan Wedding: 'खूप नाचले, थकवा आला, मला लो बीपीचाही त्रास...'; सूरज चव्हाणच्या लग्नानंतर अॅडमिट का झाली? जान्हवी किल्लेकरनं सगळंच सांगितलं