Rajyog On 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे अनेक शुभ राजयोग (Rajyog) निर्माण होतील. याचा प्रभाव मानवासह पृथ्वीवर दिसून येणार आहे. माहितीसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन शुभ राजयोग जुळून येणार आहेत. यामध्ये मालव्य राजयोग, सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य राजयोग, तसेच, मंगळ आणि चंद्र ग्रहाच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या संयोगाने काही राशींचे अच्छे दिन सुरु होतील. या राशींच्या (Zodiac Signs) करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी तीन राजयोग जुळून येणं लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या कामकाजात चांगली प्रगती दिसून येईल. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन नोकरीचे प्रस्ताव तुम्हाला येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. त्याचबरोबर तुमच्या कारभाराचा देखील विस्तार वाढलेला दिसेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुमचं एका शहरातून दुसऱ्या शहरात सतत प्रवास होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. त्याचबरोबर, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. हातात नवीन प्रोजेक्ट येऊ शकतं.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
नवी वर्ष कुंभ राशीसाठी सकारात्मक परिणाम देणारं ठरणार आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असेल. सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :