Kushal Badrike and Hemangi Kavi :  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ (Madness Machaenge India Ko Hasaenge) हा कार्यक्रम  सुरु होणार आहे. या कार्यक्रमातून कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि हेमांगी कवी (Hemangi Kavi) यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये. या कार्यक्रमाचा पहिला गेस्ट हा 'बिग बॉस 17'चा मुनव्वर फारुकी () असणार आहे. या शो मध्ये हुमा कुरेशी ही ‘मॅडनेस की मालकीन’ असणार आहे. हर्ष गुजराल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. परितोष त्रिपाठी, स्नेहिल दीक्षित मेहरा (बीसी आंटी), गौरव दुबे, केतन सिंह, अंकिता श्रीवास्तव, कुशल बद्रिके, इंदर साहनी आणि हेमांगी कवी यांसारखे विनोद बहाद्दर या शोसाठी सज्ज झालेत. 


या वीकेंडपासून म्हणजेच 9 मार्चपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या वीकएंडला मॅडनेसची पातळी आणखी उंचावण्यासाठी या शो मध्ये मुनव्वर फारूकी पहिला गेस्ट म्हणून येणार आहे. आपल्या शोचे ओपनर म्हणून प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडीयन हर्ष गुजराल मुनव्वरच्या या आधीच्या परफॉर्मन्सेसची आठवण काढून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसेल आणि मग हर्ष आणि मुनव्वर दोघे मिळून ‘UP व्हर्सेस डोंगरी’ हा अॅक्ट प्रस्तुत करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. हुमा कुरेशी देखील त्यांच्या या अॅक्टला दाद देताना दिसेल. त्यानंतर, केतन सिंह, कुशल बद्रिके, अंकिता श्रीवास्तव, स्नेहिल मेहरा दीक्षित (BC आंटी) आणि इंदर साहनी एकत्र मिळून एक ‘अॅनिमल स्पूफ’ सादर करणार आहेत. 






‘स्वयंवर रोस्ट’ उडवणार धम्माल


इतकेच नाही, तर मुनव्वर आणि परितोष यांच्यातल्या मजेदार शायरी स्पर्धेमुळे फारच रंगत येईल. त्यानंतर मुनव्वरच्या रूपात गौरव अभिनीत ‘स्वयंवर रोस्ट’ धमाल उडवेल. मुनव्वर रिव्हर्स रोस्ट देखील करताना दिसेल, ज्यात तो सगळ्या सहभागींना कोट्या आणि विनोद करून रोस्ट करताना दिसेल.शो सुरू होत असल्याबाबतचा उत्साह व्यक्त करताना आणि मुनव्वरशी संभाषण केल्याचा अनुभव सांगताना गौरव दुबे म्हणाला, “‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ चा एक भाग असणे हा एक रोमांचक अनुभव आहे. एक टीम म्हणून आम्हा सर्वांचे लक्ष्य गंमतीशीर गॅग्जद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आहे.


ही बातमी वाचा : 


Maidaan Movie : टीम इंडिया हैं हम..., अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्येच अजय देवगनने 'मैदान' मारंल! 'या' दिवशी सिनेमागृहात करणार एन्ट्री