UP Election 2022 : समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपण युती करत असल्याबाबतची घोषणा केल्यानंतर समाजवादी पार्टीकडून राष्ट्रवादी-सपाचे बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर विधानसभेची जागा राष्ट्रवादीचं उमेदवार के. के. शर्मा लढवतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता सोशल मीडियात ती जागा समाजवादी पक्षानं काढून घेतली असल्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू होती. याला आता उत्तर प्रदेशचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी उत्तर दिलं आहे. यादव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, सध्या ज्या सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत. त्या खोट्या आहेत. उलट आज आमची समाजवादी पक्षाचं प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथे इतर जागांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला ज्या पक्षांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्या सर्वच पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित असतील. या बैठकीत प्रामुख्यानं इतर जागांबाबत अखिलेश यादव यांच्या सोबत चर्चा होणार आहे. 


सोमवारी सोशल मीडियात राष्ट्रवादीकडून समाजवादी पक्षानं जागा काढून घेतल्याबाबत चर्चा रंगल्या नंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीला ट्विटरच्या माध्यमातून लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आपल्या ट्वीटच्या माध्यमातून आमदार अतुल भातखळकर म्हणतात की, समाजवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात संजय राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात. तर आमदार राम सातपुते यांनी याला अपमान नाही, तर लायकी दाखवली म्हणतात. आशा शब्दांत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.


दरमान्य, याबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी फोनवरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता नवाब मलिक म्हणाले की, "भाजपकडून ज्याप्रकारे दावा केला जातो आहे की, राष्ट्रवादीला देण्यात आलेली जागा काढून घेण्यात आली आहे. तो दवा पूर्णतः खोटा आहे. असा कुठलाही प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडलेला नाही. आम्हाला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर विधानसभेची जागा दिली आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार के के शर्मा हे असणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा