Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. छोट्या पडद्यावरील वेगवगेगळ्या कार्यक्रांमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती सिंह आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीमध्ये भारतीनं कपिलला हार्ड वर्किंग म्हणत त्याचं कौतुक केलं. 


सिद्धार्थ कननच्या मुलाखतीमध्ये भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया आणि फराह खान हे त्यांच्या आयुष्यामधील येणारे अनुभव सांगत होते. यावेळी भारती सिंहनं कपिलचे कौतुक केलं. ती म्हणाली, 'कपिल कधीच माघार घेत नाही. त्याच्या आयुष्यात बरेच चांगले वाईट प्रसंग आले पण त्यानं कधीच माघार घेतली नाही.   '
 
पुढे ती म्हणाली, 'लोक म्हणत होते की आता नशेमुळे याचे करिअर संपणार. पण आज देखील त्याचा शो प्रेक्षक आवडीनं पाहतात. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, फराह खान  असे प्रसिद्ध कलाकार त्याच्या शोमध्ये येतात. '
 
रिपोर्टनुसार, 2017 साली कपिलला नशा करायची वाईट सवय लागली होती. कपिलनं सांगितलं होतं की, फिरंगी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी परफॉर्म करताना तो चालू देखील शकत नव्हता. त्यामुळे शूटिंग रद्द करावे लागले होते. 


भरती सध्या खतरा खतरा आणि हुनरबाज या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमधील तिच्या विनोदी अंदाजानं ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha