Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सलमान त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. पण एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याला झालेल्या आजाराबाबत सांगितले होते.
2017 मध्ये सलमानचा ट्यूबलाइट हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याला झालेल्या 'ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया' (Trigeminal Neuralgia) या आजाराबद्दल सांगितलं. हा न्यूरोलॉजीकल आजार आहे. सलमाननं सांगितली की, हा आजार झाल्यानंतर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण योग्य उपचार घेतल्यानंतर सलमान बरा झाला. या आजाराला सुसायडल डिसिज (Suicidal Disease) देखील म्हणले जाते.
लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या :
- Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...
Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केली सबासाठी खास पोस्ट ; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha