Astrology Panchang 28 December 2024 : आज 28 डिसेंबरचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस. आजचा दिवस खास आहे. कारण आज शनीचा वार आहे तसेच, आजच्या दिवशी अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आलं आहे. आज त्रयोदशी तिथी आहे. तसेच, शनी प्रदोष (Shani Pradosh) व्रतसुद्धा आहे. आजचं शनी (Shani Dev) प्रदोष व्रत हे 2024 वर्षातील सर्वात शेवटचं व्रत आहे त्यामुळे देखील याला विशेष महत्त्व आहे. तसेच, आजच्या दिवशी राशी परिवर्तन योगासह शश योग (Yog) आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशींवर शनीदेवाची विशेष कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक जाणार आहे. आज तुम्ही कोणतंही कार्य हाती घेताना नीट विचार कराल मगच निर्णय घ्याल. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगला जॉब मिळू शकतो. फक्त स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी मंगलमयी असणार आहे. आज शनीदेवाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विास झालेला दिसेल. जर तुम्हाला तुमचे पैसे आज एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवायचे असतील तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या घरात धार्मिक आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. तसेच तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही एखाद्या नवीन कार्याची देखील सुरुवात करु शकता. आरोग्य अगदी ठणठणीत असेल. काळजी करण्याची गरज नाही. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही ठरवलेलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. त्यात कोणताच अडथळा जाणवणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट पाहायला मिळेल. त्यामुळे आनंदी आणि सकारात्मक वातावरण असेल. संध्याकाळी घरी खास पाहुण्यांचं आमंत्रण मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असमारआहे. आज तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकता येईल. त्यातून तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही गरजूंना देखील मदत करु शकता. तसेच, संध्याकाळचा वेळ तुमचा धार्मिक कार्यात जाईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 28 December 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य