Best Crime Thriller Film On Netflix: जर तुम्हाला क्राईम थ्रिलर चित्रपट (Crime Thriller Movie) आवडत असतील, तर नेटफ्लिक्सवर (Netflix) नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा. काही दिवसांपूर्वीच हा क्राईम-थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. जिनं रिलीज होताच ओटीटीचा ताबा घेतला. हा सुपरडुपर हिट चित्रपट म्हणजे, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी आणि जिमी शेरगिल स्टारर 'सिकंदर का मुकद्दर' (Sikandar Ka Muqaddar). या चित्रपटाचं कथानकानं प्रेक्षकांवर भूरळ घातली. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की, हा क्राईम-थ्रिलर खूपच मनोरंजक असणार आहे. चित्रपट प्रदर्शित होताच, त्याचा समावेश टॉप ट्रेंडिंगमध्ये झाला.  या चित्रपटानं नेटफ्लिक्सवरच्या इतर बिग बजेट चित्रपटांनाही मागे टाकलं. 


चोर, पोलिसाची कहाणी पाहून चक्रावून जाल 


या चित्रपटात जिमी शेरगिल, तमन्ना भाटिया आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती शीतल भाटिया यांनी केली आहे. 2 तास 32 मिनिटांचा हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलनं भरलेला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा चोर पोलिसाची आहे. ज्यामध्ये 60 कोटी रुपयांचे लाल हिरे चोरीला जातात आणि त्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात अशा घटना घडतात की, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत खिळून राहता. 


नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर का मुकद्दर'ची कथा हिऱ्यांच्या चोरीवर आधारित आहे. हिऱ्यांच्या प्रदर्शनातून लाल हिरे चोरिला जातात. ज्याची किंमत 60 ते 60 कोटी रुपये आहे. पोलिसांना या मोठ्या चोरीची माहिती मिळते आणि मग पोलीस अधिकारी जिमी शेरगिलची या कथानकात एन्ट्री होते. चित्रपटाची सुरुवात जितकी मनोरंजक आहे, तितकाच त्याचा क्लायमॅक्सही भारी आहे. या चित्रपटाची कथा इतकी साधी आहे की, खरा चोर कोण? याचा शेवटपर्यंत कोणालाच अंदाज येत नाही.


पोलिसाचा संशय कुणावर? 


नेटफ्लिक्सच्या वतीनं ट्रेलर शेअर करताना कॅप्शन लिहिलं होतं की, 'कौन है मासूम, कौन है मुजरिम, और कौन है सबसे शातिर?' जिमी शेरगिलला मंगेश देसाई (राजीव मेहता), कामिनी सिंह (तमन्ना भाटिया) आणि सिकंदर शर्मा (अविनाश) यांच्यावर चोरीचा संशय आहे.पण नेमका चोर कोण असतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहता येईल.