दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीतील शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी दाखल झाले. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवार आणि पक्षाचे काही नेते शरद पवारांना (Sharad Pawar) भेटण्यासाठी दाखल झाले. अजित पवारांसोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे व प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार सुनेत्रा पवार देखील अजित पवारांसोबत शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचल्या. पक्षाचे बडे नेते देखील यावेळी उपस्थित आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार हे पवार कुटुंबातील सदस्य आहेत, परंतु त्यावेळी त्यांच्या पक्षाचे इतर प्रमुख नेते आहेत, पक्षाच्या मुख्य निर्णयावेळी त्यांची भूमिका महत्त्वाची असते ते नेते देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता वाढदिवस हेच खरं कारण होतं का किंवा यामागे आणखी काही वेगळं कारण आहे का अशा तर चर्चांना उधाण आलं आहे.
काल अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले. अजित पवार यांनी काल भाजपच्या कोणत्याही बडे नेत्याची भेट घेतलेली नाही. अमित शाह यांच्या बैठकीत देखील ते नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार दिल्लीत आले होते का अशा चर्चा सुरू आहेत.
या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क देखील लावले जात आहेत. महाराष्ट्राकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दृष्टीने पाहता जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. तोपर्यंत त्यांच्यासाठी एक छुपं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोबत घेऊन येऊ शकले किंवा शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेऊन येऊ शकले. तर, नरेंद्र मोदी यांचं सरकार मजबूत होईल चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापैकी एकाची गरज त्यांच्या दृष्टीने संपेल मोदींचं सरकार हे स्वबळावर जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे
देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या नेत्यांच्या भेटी
राज्यातील मंत्रिमंडळाच्या बाबतीत अद्याप चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षातील कोणते नेते मंत्री असणार त्याच पक्षाचे प्रमुख ठरवतील. एखाद्या मोठं फार आक्षेपार्ह नाव असेल, तर वेगळा निर्णय किंवा वेगळी भूमिका भाजप श्रेष्ठ नेते त्यांना सांगू शकतात, अशा चर्चा आहेत. तर काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर अजित पवार या भेटीगाठींमध्ये कुठे दिसले नाहीत. त्यामुळे अजित पवार शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीत आले होते का? त्यांच्यासोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. तरी राजकारणात कितीही कटूता आली तरी दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, दोघांमध्ये भेटीगाठी होऊ शकतात, जर ही कौटुंबिक भेट असती तर फक्त कुटुंबातील सदस्य यामध्ये दिसले असते. पण, यावेळी पक्षाचे देखील अनेक बडे नेते उपस्थित असल्याने अनेक चर्चा सुरू आहेत.