Best 5 Psychological thriller movies : सस्पेन्स आणि थ्रिलर (Thriller Movies) सिनेमांचा चाहतावर्ग दिवसागणिक वाढतोय. याचं कारण हे सिनेमे प्रेक्षकांना खिळवून तर ठेवतातच, पण विचार करण्यासही भाग पाडतात. विशेष म्हणजे, असे सिनेमे प्रेक्षकांना अशा एका टप्प्यावर नेऊन सोडतात, जिथे विचार करण्यापलीकडे तुम्हाला काही सुचतच नाही. जर तुम्हीसुद्धा या प्रेक्षकांपैकी एक असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही सर्वोत्तम थ्रिलर सायकोलॉजीकल सिनेमांची आणि सिरिजची यादी घेऊन आलो आहोत जे तुम्ही पाहिलेच पाहिजेत... 


टॉप 5 सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमांची यादी : 


Shutter Island : हा सिनेमा 2010 साली प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मार्टिन स्कोरसेसे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून या सिनेमात मार्क रफालो, एमिली मोर्टिमर आणि लियोनार्डो डिकॅप्रियो मुख्य भूमिकेत आहेत. 



Dark 3 : सीजनचा हा जर्मन शो तुम्हाला पूर्णपणे खिळवून ठेवतो. या सिरीजला आयएमडीबीवर 8.8 रेटिंग मिळाली आहे. 


Hannibal : क्राईम, ड्रामा आणि थ्रिलरने भरलेला हा शो तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. या शो ला आयएमडीबीवर 8.5 रेटिंग मिळाली होती. हा शो तुम्ही अॅमेझॉन प्राईमवर बघू शकता. 



Joker : या धमाकेदार सिनेमाला प्रेक्षकवर्गात खूप पसंती मिळाली आहे. एक माणूस ज्याला नेहमी अपामानीत केले जाते, तो सूड घेण्यासाठी कशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळतो. ही या सिनेमाची कथा आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा सिनेमा पाहिला नसेल तर हीच संधी आहे, नक्की पहा. 


Gone Girl : या सिनेमात एका कपलची गोष्ट आहे. जेव्हा एका सामान्य माणसाची पत्नी बेपत्ता होते. तेव्हा तो तिचा शोध घेण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, ही कथा सांगणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. हे सर्व सिनेमे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमवर तुम्हाला बघायला मिळतील.



हे ही वाचा :



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह