Bengali Actress Shraboni Banik Dies: बंगाली सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री श्रबोनी बोनिक यांचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 41व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची फुफ्फुसांच्या कॅन्सरसह झुंज सुरू होती. ही झुंज अखेर संपली. त्यांचे कोलकाता येथे निधन झाले. श्रबोनी बोनिक यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक बाबू बनिक यांनी दिली. श्रबोनी बोनिक यांच्या मृत्यूनंतर बंगाली टेलिव्हिजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त
श्रबोनी बोनिक या गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसांच्या अॅडेनोकार्सिनोमा या आजारातून त्रस्त होत्या. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. त्यांना या आजाराचा प्रचंड त्रास झाला होता. त्रास वाढल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
जवळच्या मित्राकडून शोक व्यक्त
श्रबोनीचे जवळचे मित्र बाबू बनिक यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. "काही ओळखी कामातून होतात. तर काही ओळखी इंटरेस्ट, परिस्थिती किंवा आवडी निवडीच्या पलिकडे जाऊन होतात. जे दोन कुटुंबांना एका अदृश्य धाग्याने बांधते. तेव्हाच त्याला खरी मैत्री म्हणतात. आज श्रबोनीला गमावल्यानंतर प्रचंड दु:ख झाले. ती इतक्या लवकर आयुष्यातून निघून जाईल, वाटले नव्हते. यावर माझा विश्वास बसत नाही. श्रबोनीचे कार्य लोकांच्या मनात कायमचे राहील. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदत
दरम्यान, या वर्षीच्या सुरूवातीला श्रबोनी यांचा मुलगा अच्युत आदर्श याने त्याच्या आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदत मागितली होती. त्यानं पोस्ट शेअर करून आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. श्रबोनीने बंगाली टिव्ही आणि चित्रपटांमधील एक परिचित चेहरा म्हणून ओळखली जात होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रबोनी चांदेर बारी (2007) भुटू (2016) आणि सोहाग चांद (2022) मधील तिच्या अभिनयासाठी ओळखली जात होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
गौतमीचा 'सपनो का राजकुमार' कोण? मुलाकडून तिच्या अपेक्षा काय? म्हणाली, 'असा मुलगा हवाय जो...