Guru Asta 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, देवगुरु ग्रह बृहस्पतीने मागच्या महिन्यात 11 नोव्हेंबर 2025 रोजी कर्क राशीत वक्री चाल सुरु केली होती. आतासुद्धा गुरु वक्री अवस्थेतच आहेत. तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीलासुद्धा गुरु ग्रहाची वक्री चाल सुरुच असणार आहे. नवीन वर्षात 11 मार्च 2026 रोजी मिथुन राशीत मार्गी होणार आहे. या दिवशी गुरु ग्रह पुन्हा मार्गी (Guru Margi) अवस्थेत येतील.
गुरु बृहस्पती 11 मार्च 2026 पासून 12 डिसेंबर 2026 पर्यंत मार्गी चाल चालणार आहेत. म्हणजेच नवीन वर्षात गुरु ग्रह जवळपास 10 महिन्यांपर्यंत सरळ चाल चालणार आहेत. गुरुची ही मार्गी चाल नवीन वर्षात तीन राशींना चांगला लाभ देणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
नवीन वर्षात गुरु ग्रहाची मार्गी चाल होताच मेष राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम मिळतील. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळतील. व्यवसायिकांचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे तुम्हाला सहज पूर्ण करता येतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
गुरुची मार्गी चाल मिथुन राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. या काळात कोणतीही जोखीमपूर्ण कामे हातात घेऊ नका. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाच्या मार्गी चालीमुळे प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)