Pranjal Dahiya Slams Misbehaving Audience: आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने लाखो लोकांचे मन जिंकणारी हरियाणवी अभिनेत्री  प्रांजल दहिया (Pranjal Dahiya) पुन्हा  एकदा चर्चेत आली आहे.  पण ती यावेळी तिच्या गाण्यामुळे आणि डान्समुळे  नाही तर,  वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच प्रांजलने एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केला होता. या कॉन्सर्टमध्ये तिने काही गाण्यांवर नृत्य सादर केले.  मात्र, लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान, एक विचित्र घटना घडली.  कार्यक्रमादरम्यान, काही प्रेक्षकांनी गोंधळ घातला.  तसेच काही लोकांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रांजल भडकली. तिने स्टेजवरून गोंधळ घालणाऱ्यांना चोख उत्तर दिले.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

प्रांजल दहियाला राग अनावर

Continues below advertisement

प्रांजल दहिया एका  स्टेज शोमध्ये  सादरीकरण करत होती.  स्टेजसमोरील काही प्रेक्षक सतत जोरजोरात ओरडत होते. तसेच आवाज करत होते.  यावेळी काहींनी अभिनेत्रीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.      प्रेक्षकांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रांजलला राग अनावर झाला. तिचा संयम सुटला. तिने स्टेजवरून प्रेक्षकांना फटकारले. यात काही वृद्धांचाही समावेश होता. त्यांच्यावर तिने टीका केली.   याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

प्रांजल व्हिडिओमध्ये प्रेक्षकांवर भडकली असल्याचं दिसून येत आहे.  प्रेक्षकांना प्रांजल म्हणते, "तु्म्हा सर्वांना एक सून आणि एक मुलगी आहे.  आणि तुम्ही तात्या, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. तुम्ही तोंड फिरवू नका, जॅकेटवाले तात्या, मी तुमच्यासोबत बोलत आहे. थोंड कंट्रोलमध्ये राहा की... आमचा परफॉर्मन्स अजून बाकी आहे. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घ्या. पण आम्हाला सहकार्य करा..", असं प्रांजल म्हणत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे.

प्रांजलचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

दरम्यान, प्रांजलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रांजलचे  कौतुक केले आहे.  तर, काही जण अभिनेत्रीचा  अहंकार म्हणत आहे.  एका नेटकऱ्याने म्हटले की, 'प्रांजलने योग्य काम केले आहे.   कलाकारांना खेळण्यासारखे वागवू नये', तर, आणखी एकाने 'भारतात कसे लोक आहेत.  त्यांच्यासमोर कलाकारांनी परफॉर्म कसे करावे? हीच त्यांची मानसिकता आहे का? असा सवाल करत कमेंट केली.  सध्या प्रांजलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.