Gautami Patil: सबसे कातिल गौतमी पाटील. राज्यात हिनं अल्पवधीतच धुमाकूळ घातला. तिनं करिअरची सुरूवात स्टेज शोवरून केली. मात्र, तिच्या दिलखेचक अदांमुळे ती सर्वांची फेवरीट झाली. तिचे प्रत्येक शो हिट झाले. काही ना काही कारणांमुळे ती कायम चर्चेत राहायला लागली. तिला हळूहळू गाण्यांच्या अल्बममध्ये संधी मिळाली. तिनं संधीचं सोनं केलं. गौतमीने मराठी इंडस्ट्रीतही एन्ट्री केली.  तिचं चित्रपटातील गाणं प्रचंड व्हायरल झालं. गौतमीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती कायम प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयु्ष्यामुळेही चर्चेत आली आहे.  सध्या गौतमी लग्न कधी करणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. तिनं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं  उत्तर दिलं. तसेच तिला नेमका कसा मुलगा हवा आहे? याबद्दलही सांगितले. यांचं उत्तर जाणून घेण्यासाठी तिचा प्रत्येक चाहता उत्सुक आहे. 

Continues below advertisement

गौतमी पाटीलने नुकतंच इट्स मज्जाला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत तिला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. तिला लग्नासाठी मुलाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल  प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर गौतमी म्हणाली, "मुलगी कोणतीही असली तरी, तिला समजून  घेणारा नवरा हवा असतो. मी सध्या ज्या फिल्डमध्ये आहे. ते स्वीकारणारा हवा. माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहत. या सगळ्या गोष्टी स्वीकारणारा हवा.  तसेच मला समजून घेणारा  पाहिजे आहे. मी माझ्या आईला सोडू शकत नाही.  ती माझ्यासोबत कायम राहणार.  मला जेव्हा  करायचं आहे, तेव्हाच मी लग्न कऱणार", असं  गौतमीने स्पष्ट केलं.

या मुलाखतीदरम्यान गौतमी पाटीलला तिच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबतही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर गौतमी म्हणाली, "मला पुन्हा काही संधी मिळाली तर मी नक्की करेन. माझं सध्या सुरू आहे. सोबत अभिनयही सुरू आहे", असं गौतमी म्हणाली.  तिला बिग बॉस मराठी 6मध्ये जाणार का? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर गौतमी म्हणाली, "मी एका कार्यक्रमाला गेली होती.  तेव्हा तिथे मला काही प्रेक्षक, बिग बॉसला जाणार ना? असा प्रश्न विचारत होते.  पण मी जास्त दिवस माझ्या घरापासून लांब राहू शकत नाही.  चाललंय, सगळं छान सुरू आहे. तसेच व्यवस्थित सुरू राहू दे", असं गौतमी म्हणाली.

दरम्यान, गौतमी पाटीलने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.  यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधला.   तिला "पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने, "अरे बापरे.. मला  खरंतर राजकारणार इंटरेस्ट नाही.  मी पुढे आयुष्यात कधीही राजकारणात जाणार नाही.  मी अभिनय तसेच कला सादर करत राहील", असं गौतमी पाटील म्हणाली.