'BB Ki Vines' : बाजारात तुरी, भट भटणीला मारी...  म्हणलं की हिंदी चित्रपट 'हेरा फेरी' चा बाबुराव गणपतराव आपटेचा तो सिन आठवतो...  बक्कळ पैसे लवकरच हाती येणार आहेत म्हणून बाबुराव त्याच्या स्टाईल ने सर्व देणी दारांना गोळा करतो आणि त्यांना व्याजासकट पैसे परत करण्याचं आश्वासन देतो पण पुढं काय होतं सर्वांनी पाहिलं असेलच! 


स्वप्नं आधीच जगायची एक सवय कॉमन मॅन ला असते... म्हणजेच काय तर नोकरी लागली की पगारातून काय खरेदी करणार किंवा... सुंदर अशी नवीन गाडीची बुकिंग केली की लगेचच ठरतं की गाडी घेऊन कुठे-कुठे ट्रिपला जायचं...अशी अनेक स्वप्नांची दवंडी गावभर पेटवताना आपल्याच अवतीभोवती असलेली मंडळी पुष्कळवेळा पाहायला मिळते, अश्यातल्याच काहींचा पचका होतो... म्हणजेच आधीच एखाद्या गोष्टीची गावभर दवंडी पेटवली जाते आणि ती गोष्ट पूर्णत्वास जातच नाही... आणि गावभर एकच हशा पसरतो.. 


असंच काहीसा प्रकार बीबी की वाईन्स फेम प्रसिद्ध युट्युबर भुवन बामच्या नव्या नव्या वेब सिरीज ढिंढोरा मध्ये पाहायला मिळणार आहे, ढिंढोरा ची गोष्टही काही अशीच आहे... ट्रेलर आल्याबरोबरचं त्याचे चाहते नेटिझन्स अक्षरशः ट्रेलर वर तुटून पडले 22 मिलियन+ व्यूज वेब सिरीज च्या ट्रेलर ला आले.. आणि वेबसिरीज चा पहिला भागही बीबी च्या चॅनेल वर तुफान राडा करतोय... याचं कारणही तसं खासच आहे.






भुवन त्याच्या युट्युब चॅनेल वर वेगवेगळे नऊ पात्र रंगवतो, हे नऊच्या नऊ पात्र या वेबसिरीज मध्ये आहेत आणि याचंच कौतुक बाहुबली चे एस एस राजामौली यांनी ट्विटर वर पोस्टर लॉंच करत देखील केलेलं आणि कित्येकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या!






ढिंढोरा या वेबसिरीज बद्दल एवढी चर्चा का? तर कोरोना च्या संकटात भुवन ने आई वडिलांना गमावलं, त्यानंतर त्याच्या चाहत्यांसाठी कोणतेही व्हिडीओ आलेले नव्हते. देशातील नंबर वन वर असलेल्या युट्युबरचं करियर संपलं की काय अशी शंका कित्येक इतर युट्युबर्सने व्यक्त केलेली, प्रचंड मेहनतीने खास शैलीत विविध पात्र तो रंगवतो त्याहून अधिक मेहनतीने एकदम क्रिएटिव्ह रित्या सर्व पात्र एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळतात आणि याची चर्चा ही गावभर झालीच आहे! भुवन च्या वाईन्स ची क्रेझ तरुणांमध्ये प्रचंड आहे कारण जरी सहकुटुंब सहपरिवार व्हिडीओज पाहता येतील अशे संवाद नसतात.. पण तरीही बीबी त्याच्या शैलीत चांगले मेसेज प्रेक्षकांना देतो विचार करण्यास भागही पाहतो. ढिंढोरा साठी देशातील इतर सर्व मोठ्या युट्युबर्स ने भुवन ला शुभेच्छा ही दिल्यात, ट्रेलर मध्ये धमाल,मस्ती, इमोशनल ड्रामा, गोंधळ आणि सकाळच्या नाष्ट्या पासून टिकटॉक पर्यंत चे विषय नेटिझन ला कमालीचे आवडलेत.


14 तारखेला रिलीज झालेल्या ला पहिल्या भागाची  IMDB रेटिंग आज 9.4 आहे, ढिंढोरा या वेबसिरीज मध्ये भुवन सहित जिवेशु अहलुवालिया, गायत्री भारद्वाज, बद्री चव्हाण, इश्तियाक खान, अरुण कुशवाही, देवराज पटेल, अंकुर पाठक सोबतच अनुप सोनी आणि राजेश तेलंग यांचा अभिनय सुद्धा पाहायला मिळणार आहे. 


खरंतर देशात प्रथमच अशी वेबसिरीज तेही स्वतःच्या युट्युब चॅनेल वर आल्याचा आनंदात आई बाबा सोबत नाहीयेत हे मागे सोडून आज भुवन अभिनय, गायकी, क्रिएटिव्ह कॉन्टेन्ट आणि  त्याच्या या मेहनतीवर त्याची मात्र स्वप्नं पूर्ण करतोय, ढिंढोरा मधील गोष्ट काय आहे ती नक्की पाहा!