पंढरपूर : एक रकमी एफआरपी देणे शक्य नसून नीती आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार यंदाही एफआरपीची रक्कम तीन टप्प्यातच दिली जाणार असून जरी यंदा साखरेचे दर वाढले असले तरी एफआरपी पेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नसल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. आज सांगोला सहकारी साखर कारखाना गाळप शुभारंभ सोहळ्यासाठी आले असता बोलत होते. 


खरंच साखर कारखानदारांची अवस्था मुंबईतल्या गिरणींसारखी होऊ शकते? समरजित सिंह घाडगे यांच्याशी बातचीत


स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपी साठी राज्यभर आंदोलन सुरु केले असताना आज पुन्हा सहकार मंत्र्यांनी तीन टप्प्यातच एफआरपी देणार असल्याचे सांगितल्याने शेतकरी संघटनांना शासनाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. सध्या ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेला एफआरपी पेक्षा जास्त दर मिळत असले तरी गेली दोन वर्षे 3100  चा दर मिळत नसल्याने कमी दरात कारखान्यांना साखर विकावी लागली होती . त्यामुळे यंदा  साखरेचे दर जास्त असले तरी एफआरपी पेक्षा जास्त दर दिला जाणार नसल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. 



एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने तो कारखान्यांचा फायदा समजून आयकर विभागाने कारखान्यांना नोटीस पाठवल्या


राज्यातील 98 टक्के कारखान्यांनी एफआरपी दिल्याचे सांगत यंदा 190 पेक्षा जास्त कारखाने गळतात राहतील असे सांगितले . काही चांगल्या कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्याने हा कारखान्यांचा फायदा समजून आयकर विभागाने कारखान्यांना नोटीस पाठवल्या होत्या . मात्र मिळालेले जादाचे पैसे शेतकऱ्यांना वाटण्यासाठी हा जादाचा दर दिला असताना आयकर विभागाच्या नोटीस आल्याने याविरोधात न्यायालयीन लढाई सुरु असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. केंद्रात पूर्वीपासून सहकार विभाग होता मात्र तो कृषी मंत्रालयाकडे होता . आता नव्याने सुरु झालेले सहकार मंत्रालय राज्यासाठी त्रासदायक न ठरत फायदेशीर ठरावे अशी अपेक्षा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सांगोला कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील , सहकार शिरीमंतीचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे उपस्थित होते.