Ayali Webseries ZEE5 App: विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) विविध जॉनरचे चित्रपट आणि वेब सिरिज दर आठवड्याला रिलीज होतात. झी 5वर सध्या कॉमेडी ते थ्रिलर विविध जॉनरचे वेब सिरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. आज आम्ही अशा एका वेब सिरीजबाबत (Tamil Web Series)बोलत आहोत,  ज्यात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार हे नक्कीच. ही तामिळ वेब सिरीज असून, ही वेब सिरीज आपण झी 5 (ZEE5) वर पाहू शकता.  या वेब सिरीजचं (Ayali) नाव काय आहे? पाहूयात.

Continues below advertisement

वेब सिरीजचं नाव काय? स्टोरीमध्ये नेमकं आहे तरी काय? (Ayali Webseries ZEE5 App 8 Episode Tamil Web Series)

आपण ज्या वेब सिरीजबद्दल आहोत, त्या वेब सिरीजचं नाव 'अयाली' असं आहे. 'अयाली' ही एक तामिळ सस्पेंस आणि थ्रिलर वेब सिरीज आहे.  कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या वेब सिरीजमध्ये थ्रिलर पाहायला मिळते.  या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.  'अयाली' या वेब सिरीजमध्ये एक तरुण मुलगी सेल्वीची स्टोरी दाखवण्यात आली आहे.  सेल्वीला डॉक्टर व्हायची इच्छा असते. पण सेल्वी ज्या गावात राहते, त्या गावात शतकानुशतके 'अयाली' देवीची पूजा केली जाते. 

सेल्वीच्या गावात एक वेगळीच प्रथा आहे. मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिची शालेय शिक्षण बंद केलं जातं.  तसेच तिचे जबरदस्तीने लग्न लावलं जातं. त्यामुळे सेल्वी कायम पिरीयड्स येऊ नये, याचाच विचार करत असते.  पण जेव्हा तिला मासिक पाळी येते,  तेव्हा सेल्वी खूप घाबरते. आपल्या कुटुंबापासून ती मासिक पाळीची गोष्ट लपवते.  पण एके दिवशी तिच्या आईला सेल्वीला मासिक पाळी येत असल्याचं समजते. तेव्हा सेल्वी आपल्या आईला वडील आणि इतर कुटुंबाला ही गोष्ट सांगू नको अशी विनंती करते. पण यानंतर या स्टोरीमध्ये मोठा ट्विस्ट येतो. 

Continues below advertisement

या स्टोरीमध्ये नेमकं कोणते ट्विस्ट आणि टर्न्स येतात, यासाठी आपल्याला Muthukumar दिग्दर्शित ही वेब सिरीज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहावी लागेल. या सिरीजमधील क्लायमेक्स पाहण्यासारखं आहे.  'अयाली' या वेब सिरीजला 8.5 रेटिंग मिळाली आहे.  या वेब सिरीजमध्ये सेल्वी ही भूमिका अभि नक्षत्रा हिने साकारली आहे. तिची  भूमिका प्रेक्षकांना आवडली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Aadesh Bandekar in Hamal De Dhamal: 'हमाल दे धमाल'च्या 'ढाकुमाकुम' गाण्याची आठवण झाली? निळू भाऊंसोबत दिसले 'महाराष्ट्राचे लाडके भाऊजी', आदेश बांदेकरांची कमेंट वाचाच