Aadesh Bandekar in Hamal De Dhamal Song: दहीहंडी (Dahi handi) हा सण जवळ आला की, सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं. दहीहंडी फोडण्यासाठी लोक थर रचतात. दहीहंडी हा सण खरंतर 'गोविंदा रे गोपाळा' (Govinda Re Gopala)  या गाण्याशिवाय अपूर्ण आहे. 'ढाकुमाकुम ढाकुमाकुम' असं म्हणत गोविंदा पथक या सणाचा आनंद लुटतात. 'हमाल दे धमाल' या सिनेमातील हे गाणं आजही आवर्जून गल्लोगल्ली, मंडपात, घरात लावलं जातं. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची मुख्य भूमिका असलेला 'हमाल दे धमाल' हा सिनेमा देखील प्रेक्षक आवर्जून या सणानिमित्त टेलिव्हिजनवर लोक पाहतात. 

Continues below advertisement

'गोविंदा रे गोपाळा' आदेश बांदेकरांना पाहिलंत का? (Aadesh Bandekar in Hamal De Dhamal Govinda re Gopala Song)

'हमाल दे धमाल' या सिनेमातील 'गोविंदा रे गोपाळा' हे गाणं आपण ऐकलंच असेल.  या गाण्यात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी परफॉर्म केलं आहे. या गाण्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचं देखील नृत्य आहे. पण विशेष म्हणजे या गाण्यात आपण इतर कलाकारांनाही नोटीस केलं का? अलिकडेच 'गौरव जी' या डिजिटल क्रिएटरने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'हमाल दे धमाल' या सिनेमातील गाणं 'गोविंदा रे गोपाळा' मध्ये त्याने महाराष्ट्राचे भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांना स्पॉट केलं असल्याचं सांगितलं.

'हमाल दे धमाल'  या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, वर्षा उसगांवकर, सुधीर जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या व्यतिरिक्त या सिनेमात आदेश बांदेकर यांचीही भूमिका आहे. 'हमाल दे धमाल'  या सिनेमातील 'गोविंदा रे गोपाळा' या गाण्यात आदेश बांदेकर यांनी डान्स केला. 'ए निळू भाऊ निळू भाऊ हो बाजूला, चल जा हो बाजूला फुटाची गोळी नाही तर देईन तुला..' या गाण्याच्या कडव्यात निळू फुलेंसोबत  आदेश बांदेकर स्पॉट झाले आहेत.

सध्या हा रिल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही रिल व्हायरल होताच, विशेष म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी या रिलवर 'जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद', असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या या गाण्यात आदेश बांदेकर यांनीही डान्स केला आहे, हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.  सध्या ही रिल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Mirzapur 5 Prime Video Series: 'मिर्झापूर' आवडली? विकेंडला घरबसल्या पाहा 5 खिळवून ठेवणाऱ्या क्राइम सिरीज; 'ही' तर सत्य घटनेवर आधारित