Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. (Vidyanand Bapat Marathi News)

Continues below advertisement

पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले? (Vidyanand Bapat Beating)

तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.

Continues below advertisement

कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट? (Who is Vidyanand Bapat Pune Marathi News?)

विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.

विद्यानंद बापट यांच्या एका श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा- (Pune Vidyanand Bapat Marathi News)

विद्यानंद बापट यांच्या एका श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्...असं विद्यानंद बापट म्हणाले. या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे, असा आहे. 

विद्यानंद बापटांना शरद केळकरांची साथ- (Pune DJ Marathi News)

पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे (DJ) आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना, आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

संबंधित बातमी:

Vidyanand Bapat Pune Marathi News: DJ ला विरोध, मराठीसह घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम् श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा; कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट?