Vaibhav Mangle likely Post For Vidyanand Bapat: मराठीच्या (Marathi Language) मुद्द्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून राजकारण (Politicle Updates) आणि समाजकारण गाजतंय. त्यानंतर आला मराठी बोला, पण शुद्ध मराठीचं काय? हा मुद्दाही नेहमीच चर्चेत असतो. अशातच गणेशोत्सवातील (Ganeshotsav) डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे पुण्यातील (Pune News) एक व्यक्ती अचानक चर्चेत आली. पण, त्या व्यक्तीनं केलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोधापेक्षा, त्याची अस्खलित मराठी भाषा चर्चेचा विषय ठरतेय. आम्ही बोलतोय पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्याबाबत. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. 

Continues below advertisement

विद्यानंद बापट यांच्या शुद्ध आणि अस्खलित मराठीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर तर सगळीकडे विद्यानंद बापटांचीच चर्चा रंगली आहे. ते बोलत असलेली शुद्ध मराठी, ते वापरत असलेले शब्द ऐकून तर अनेकजण चक्रावले आहेत. अनेकांनी तर यावर मीम्सही करायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी बोलताना एक श्लोक वापरला, जो नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय. सध्या राजकारणी असो वा नेटकरी सगळीकडे विद्यानंद बापट यांची आणि त्यांच्या मराठीवर असलेल्या प्रभूत्वाचीच चर्चा होताना पाहायला मिळतेय. 

आता अख्खा सोशल मीडिया विद्यानंद बापट यांच्यावर कौतुकाची स्तुतीसुमनं उधळत असताना सेलिब्रिटी कसे मागे राहतील. अशातच आता मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी केलेल्या दोन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या या पोस्ट गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे आणि अस्खलित मराठी बोलून सर्वांना अवाक् करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्याशी जोडल्या जातायत. 

Continues below advertisement

वैभव मांगलेंनी सोशल मीडियावर काय पोस्ट केल्यात? (Vaibhav Mangle Facebook Post)

वैभव मांगले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केल्यात. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "भले त्यांच बोलणं छापील वाटतं.पण ते परिणामकारक आहे. काही ही विषयांतर करायचा प्रयत्न करा मी तेच बोलणार जे मुद्दयाच आहे. शाब्बास!"

दुसऱ्या एका पोस्टमध्ये वैभव मांगले यांनी म्हटलंय की, "कोकणातलं टॅलेंट पुण्यात धुमाकूळ घालतयं... "हा केवळ विनोद समजावा..."". अभिनेते वैभव मांगले यांनी पोस्ट करताना ना कुणाचं नाव घेतलंय ना कुणाचा उल्लेख केलाय. पण, त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. कुणी त्यांना थेट नाव घेऊन बोलण्याचा सल्ला देतंय. तर, कुणी त्यांना थेट पाठींबा जाहीर करायला सुचवतंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nilesh Sable On Upcoming Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' त्या सिनेमात नाही दिसणार...'; आगामी सिनेमाच्या स्टारकास्टबाबत निलेश साबळेंनी कोणतेही आढेवेढे न घेता थेटच सांगितलं