Avatar 2 Trailer: 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. जेम्स कॅमेरून दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 16 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'अवतार 2' चे (Avatar 2) व्हिज्युअल्स अतिशय प्रेक्षणीय आहेत. चित्रपटाच्या या ट्रेलरने प्रेक्षकांना पेंडोराच्या सुंदर निळ्या जगाची झलक दाखवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित करण्यात आला आहे.


तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाची नवी अपडेट समोर आली आहे. ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वेलचे अधिकृत शीर्षक जाहीर झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला हा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरुनच्या ‘अवतार’च्या सिक्वेलला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ असे नाव देण्यात आले आहे.


‘अवतार 2’चा 1 मिनिट 38 सेकंदांचा ट्रेलर दर्शकांना पेंडोराच्या अद्भुत जगाची झलक दाखवतो. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, ज्यामध्ये समुद्र आणि त्यात राहणारे प्राणी खास भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये सॅम वर्थिंग्टन आणि जो सल्डाना आपापल्या भूमिकेत दिसत आहेत. यावेळी ते त्यांच्या कुटुंबासह दिसत आहे.


पाहा ट्रेलर :



व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जोरावर ‘अवतार’ (Avatar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. निळ्या रंगाच्या प्राण्यांच्या विश्वावर आधारित या कथेने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा आधीच केली होती. त्यामुळेच जवळपास दशकभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचं नाव आणि ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


‘अवतार’ हा चित्रपट 2009मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल 13 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता ‘अवतार’च्या सिक्वेलमधून नवा अध्याय सुरू होणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आता जेक आणि जो सल्डाना नेटिएरी यांच्या जीवनात पुढे काय घडणार हे दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या