Shane Warne Passes Away : फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) चे काल (4 मार्च) निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. थायलंडमध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शेन वार्नचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहात आहेत.  बॉलिवूडबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. 


अभिनेता सुयश टिळकनं शेन वॉर्नचा फोटो शेअर करून 'RIP'असं लिहिले होते. मराठी बिग बॉस-3 चा स्पर्धक जय दुधाणे यानं पोस्ट शेअर करूमन लिहिले, 'शेन, द किंग ऑफ द स्पिन. तु कायम स्पिनचा राजा राहणार आहेस. RIP' तसेच अभिनेता तेजस बर्वे आणि समीर परांजपे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. तेजस बर्वेनं पोस्टमध्ये लिहिले, 'RIP LEGEND.1969-2022'




बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. शिल्पा शेट्टी,अर्जुन कपूर,सनी देओल,रणवीर सिंह, उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. 


शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


1995 साली वॉर्ननं सिमोन केलन हिच्याशी लग्न केलं. वॉर्नला जॅक्सन, समर आणि ब्रूकी हे तीन मुलं आहे. वॉर्न नेहमीच आपल्या लव्ह लाइफबाबत चर्चेत राहिला. ब्रिटिश अभिनेत्री लिज हर्ले पासून मिशेल मोनपर्यंत त्याच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत राहिल्या.


महत्वाच्या बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha