Ashutosh Rana : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे फेसबुक तसेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. फेसबुक लाइव्हमधून ते चाहत्यांसोबत संवाद साधतात. महाशिवरात्रीनिमित्त आशुतोष राणा यांनी शिव तांडव गायले होते. या शिव तांडवचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला. पण हा व्हिडीओ आता फेसबुकवरून हटवण्यात आला आहे, याबाबत आशुतोष यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. 


'मी चकित झालो आहे. फेसबुक मेटानं मी शेअर केलेला शिव तांडवचा  व्हिडीओ फेसबुक टाइम लाइनमधून डिलीट केला आहे. मला माहित नाही  मेटा इंडियानं असं का केलं.  या व्हिडीओमध्ये कॉपीराइट आणि वॉइलेशन असे कोणतेच प्रोब्लेम नव्हते. तसेच हा व्हिडीओ फेसबुकच्या नियमांविरूद्ध देखील नव्हता.', असं ट्वीट आशुतोष यांनी केले आहे. 






मेटा इंडियाच्या पेजनं आशुतोष राणा यांच्या ट्वीटला अजून कोणतेही उत्तर दिलेलं नाही. अशुतोष यांच्या अरण्यक आणि द ग्रेट इंडियन मर्डर या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. या सीरिजमधील अशुतोष यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 






संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha