Aryan Khan Won First Award For Baads Of Bollywood: सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खाननं दिग्दर्शनात (Director Aryan Khan) पाऊल ठेवलं आणि अख्ख्या जगाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानचा मुलगा इंडस्ट्रीत उतरला आणि तेही दिग्दर्शक म्हणून, आता तो पडद्यावर काय घेऊन येणार? याची सर्वांना उत्सुकता लागलेली. अशातच काही दिवसांपूर्वी आर्यन खानची पहिली वेब सीरिज 'बँड्स ऑफ बॉलिवूड' (Baads Of Bollywood) रिलीज झाली. किंग खानच्या लेकाची वेब सीरिज (Web Series) म्हणून चाहते अगदी तुटून पडले. सर्वांना आर्यन खानची (Aryan Khan) वेब सीरिज खूप आवडली. आता याच 'बँड्स ऑफ बॉलिवूड'नं आर्यन खानला त्याच्या आयुष्यातल्या पहिला पुरस्कार मिळवून दिला आहे. आयु्ष्यातला पहिला पुरस्कार मिळाल्यानं आर्यन खान खूपच खूश होता. त्यानं हा पुरस्कार त्याची आई गौरी खानला समर्पित केला आहे.
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजचा दुसरा पार्ट येणार आहे. स्वतः आर्यन खाननं 'बँड्स ऑफ बॉलिवूड'च्या शेवटी याचे संकेत दिलेत. अशातच आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आर्यन खानला आता या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
आर्यन खान काय म्हणाला?
'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर आर्यन म्हणाला, "मी सीरिजच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो, ज्यांनी नवख्या दिग्दर्शकावर विश्वास दाखवला. सर्वांनी खूप प्रेमानं, उत्साहानं काम केलं. हा माझा पहिला पुरस्कार आहे आणि मला आशा आहे की, मला असे आणखी पुरस्कार मिळतील कारण माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात. पण हा पुरस्कार वडिलांसाठी नाही तर माझ्या आईसाठी आहे. ती मला नेहमी सांगते की, लवकर झोपायचं, लोकांची खिल्ली उडवायची नाही आणि शिव्या तर अजिबातच द्यायच्या नाहीत... आणि आज त्या सगळ्या गोष्टींसाठी मला पुरस्कार मिळाला आहे. माझ्या आईला इतका आनंद देण्यासाठी आभार आणि मला माहीत आहे की, आज घरी जाऊन मला जरा कमी ओरडा बसेल..."
दरम्यान, आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये लक्ष्य, राघव जुयाल, बॉबी देओल आणि सहर अहम मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या फिल्मवर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :