Soham Bandekar Shared Emotional Post Dog Simba Died: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) पूजा बिरारी (Pooja Birari) आणि अभिनेता सोहम बांदेकर (Soham Bandekar) यांनी काही दिवसांपूर्वीच आपली लग्नगाठ बांधली. सोहम-पूजाच्या लग्नाचे (Pooja Birari Soham Bandekar Wedding Photos) अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण, त्यातल्या काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. तो म्हणजे, बांदेकरांच्या घरातला सिंबा. म्हणजेच, त्यांचा पाळीव श्वान. पण, आता बांदेकर कुटुंबीयांवर (Bandekar Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बांदेकरांच्या घरातील सर्वात लाडक्या सदस्याचं निधन झालं आहे. बांदेकरांच्या लाडक्या सिंबानं अखेरचा श्वास घेतला आहे.  

Continues below advertisement

सिंबा खरंतर एक पाळीव श्वान होता, पण बांदेकरांसाठी तो त्यांच्या घरातील सदस्यच होता. एका मुलाखतीत बोलताना सुचित्रा बांदेकरांनी सांगितलेलं की, सिंबा आणि सोहम एकत्र लहानाचे मोठे झाले. त्याला कुणी कुत्रा म्हटलेलंही आम्हाला आवडत नाही. तो आमच्यासाठी आमच्या घरातील सदस्यच आहे. बांदेकरांची सून झालेल्या पूजा बिरारीनं लग्नासाठी हातावर मेहंदीनं सिंबाचं चित्र काढलेलं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिंबा वृद्धापकाळाच्या व्याधींनी त्रस्त होता. तसेच, सिंबाला सोहमच्या लग्नाला नेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली. लग्नसोहळ्यात वावरताना त्रास होऊ नये म्हणून बांदेकर कुटुंबानं सिंबासाठी खास गाडीही तयार केलेली. सोहम स्वतःच्या लग्नातही सिंबाची काळजी घेताना दिसला. 

सोहम बांदेकरची सिंबासाठी इमोशनल पोस्ट, काय म्हणाला? 

सोहम बांदेकरनं इन्स्टाग्रामवरुन सिंबाचे काही फोटो शेअर केले आहेत. सिंबाच्या आठवणीनं सोहम भावूक झाला आहे. त्यानं पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझ्या आयुष्यातील 28 वर्षांपैकी जवळपास 17 वर्ष माझा पार्टनर, रुममेट, माझा आधार, माझा पाठिंबा आणि माझं प्रेम आम्हाला सोडून देवाच्या सानिध्यात राहायला गेलं आहे. निस्वार्थ आणि निर्मळ प्रेम दिल्याबद्दल आभारी आहे. तू आमच्यासोबत कायम राहशील." 

"तुमच्यापैकी अनेकांनी सिंबाला प्रेम दिलं, त्याची विचारपूस केली आणि त्याच्या तब्येतीबाबत जाणून घेत होतात. प्रत्यक्ष भेट झाली नसली तरीही तुम्ही त्याच्यावर भरभरुन प्रेम केलं. ते प्रेम आणि आपुलकी तोदेखील अनुभवत होता. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार...", असंही सोहम पोस्टमध्ये म्हणाला.

दरम्यान, सिंबा केवळ सोहम आणि बांदेकर कुटुंबीयांच्याच जवळ नव्हता. तर, तो त्याच्या मित्रमंडळींच्याही तेवढाच जवळ होता. सोहमच्या बायकोनं तिच्या लग्नासाठी हातावर मेहंदी काढलेली, त्यावेळी तिंनं सिंबाचं चित्र काढलेलं. सोहम आणि सिंबा लहानपणापासूनच एकत्र वाढले. त्यामुळे त्याचं जाणं बांदेकर कुटुंबीयांसाठी धक्का आहे. अनेक मराठी कलाकारांनीही सोहमच्या पोस्टवर कमेंट करुन दुःख व्यक्त केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nidhhi Agerwal Gets Mobbed At Raja Saab Song Launch Event: कुणी तिला ओढलं, कुणी तिला ढकललं... चाहते असूनही श्वापदासारखे वागले; 450 कोटींच्या सिनेमातील गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये अभिनेत्रीसोबत नको ते कृत्य