Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराई सुरू आहे. कित्येक सेलिब्रिटींनी (Celebrity Weddings) आपल्या साताजन्माच्या गाठी बांधल्यात. तर, काहींची लगीनघाई नुकतीच सुरू झाली आहे. कित्येक सेलिब्रिटींची केळवणं, लग्नापूर्वीचे विधी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी गुपचूप आपला साखरपुडा (Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engagement) उरकला असून लवकरच आता ते लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, अशातच अचानक सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो (Rashmika Vijay Wedding Photos) व्हायरल झाले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कुठे काहीच चर्चा नाही, कुठे कुणाला साधा कानोसाही नाही अन् दोघांचं लग्न लागलंही. तर, व्हायरल होणाऱ्या फोटोंवर कमेंट करुन अनेकांनी दोघांचं अभिनंदनही केलंय. पण, अशातच काही युजर्सनी रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या फोटोंवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो खरे की, खोट? (Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos)
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो खरे की, खोटे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रश्मिका नववधूच्या वेशात आहे. तिनं भरजरी साडी नेसली आहे. तर, दागिन्यांनी सजली आहे. विजय देवरकोंडान शेरवानी वेअर केली आहे. तर, दोघांच्या गळ्यात वरमाला आहेत. आजूबाजूच्या वातावरणावरुन एका शाहीसोहळ्यात दोघांनी आपली लग्नगाठ बांधल्याचं दिसतंय. तसेच, अनेक साऊथ सुपरस्टार्स या फोटोंमध्ये रश्मिका आणि विजय यांच्यासोबत दिसतायत.
व्हायरल होणारे फोटो खरे नाहीत? (Rashmika Vijay Wedding Photos Viral)
महेश बाबू, त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर आणि प्रभास सारखे प्रमुख साऊथ सुपरस्टार रश्मिका, विजय देवरकोंडासोबत फोटोत दिसत आहेत. रश्मिका, विजय देवरकोंडा या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेकजण स्टेजवर दिसत आहेत. रश्मिका, विजय देवरकोंडा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहून चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पण, तरीसुद्धा अनेक चाहत्यांना हे फोटो खरे आहेत का? असा प्रश्न पडला आहे. पण, रश्मिका मांदना आणि विजय देवरकोंडा यांचे व्हायरल होणारे फोटो खरे नाहीत, तर ते AI जनरेटेड आहेत. हे फोटो इतके खरे वाटतायत की, पाहताच क्षणी कुणीही मुर्खात निघू शकतं.
खरं तर, सत्य हे आहे की, रश्मिका, विजयच्या लग्नाचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते अजिबात खरे नाहीत. व्हायरल फोटो AI च्या मदतीनं तयार करण्यात आलेत. म्हणजेच, रश्मिका आणि विजय यांचा लग्नसोहळा झालेला नाही.
दरम्यान, आणखी एक चर्चा देखील सुरू आहे. अलीकडेच रश्मिका तिच्या गर्ल गँगसह श्रीलंकेला गेलेली. तिथून तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, ही तिची बॅचलरेट पार्टी असू शकते. रश्मिकानं अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करू शकतात. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल किंवा लग्नाच्या चर्चांवर कोणतंही भाष्य केलेलं नाही. सध्या, रश्मिका आणि विजयच्या लग्नाबाबत समोर येणारे सर्व फोटो आणि दावे निव्वळ अफवा मानले जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :