Arvind Jagtap : विधानसभा निवडणुकांसाठीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. अवघ्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया देखील पार पडणार आहे. त्याआधी निवडणुकांच्या प्रचारात प्रत्येक उमेदवाराने मतदारापर्यंत पोहचण्याचा अगदी कसोशीचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे विधानसभेच्या तोंडावर नागरिकांना बरीच आश्वासनं देखील दिली आहे. पण निवडणुका पार पडल्यानंतर यामधील किती आश्वासनं पूर्ण होणार हे पाहणंच जास्त महत्त्वाचं आहे. त्याआधी या मुद्द्याला धरुन मराठी लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी उमेदवारांना त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांना सणसणीत टोला लगावला असल्याचं पाहायला मिळालंय. 


अरविंद जगताप यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत उमेदवारांच्या भाषणाविषयी भाष्य केलंय. त्याचप्रमाणे त्यांनी एक खरमरीत टोमणा देखील या पोस्टमधून राजकीय नेत्यांना लगावला आहे. अरविंद जगतापांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. तसेच अनेकांना ही पोस्ट अगदी मनापासून पटल्याचं देखील पाहायला मिळालं.                                      


अरविंद जगताप यांची पोस्ट नेमकी काय?


अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, खूप उमेदवारांची भाषणं ऐकून आठवलेली एक म्हण...बोलण्यात गोड राघू, कामाला आग लागू...अरविंद जगतापांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे. परफेक्ट, अगदी सत्य..अशा आशयाच्या कमेंट्स अरविंद सावंतांच्या पोस्टवर अनेकांनी केल्या आहेत. 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी


मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेला मतसंग्राम अखेर शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही राजकीय लढाईच्या प्रतिष्ठेची लढाई अधिक झाली आहे. कारण यंदाच्या या निवडणुकीत अनेक नाती पणाला लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता मतदारांचा कौल कुणाच्य बाजूने लागणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच.  






ही बातमी वाचा : 


Video: दिल्लीच्या प्रदुषणात परिणीतीनं नवऱ्यासोबत सायकलवर चक्कर मारली, चाहते म्हणतायत...