Anupam Kher : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील अभिनयामुळे सध्या चर्चेत असणारे अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांचा 523 वा चित्रपट आयबी 71 (IB 71) च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.  अनुपम यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


अनुपम खेर यांनी विद्युतसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या 523 व्या चित्रपटाच्या शूटिंगला मी सुरूवात करत आहे. द गाझी अटॅक फेम संकल्प रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विद्युत जामवाल यांची अॅक्शन हीरो ही कंपनी या चित्रपटाची निर्मीती करणार आहे.  '


सत्य घटनेवर आधारित असणार चित्रपट  
रिपोर्टनुसार आयबी 71 या चित्रपटाचे कथानक हे सत्य घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटामध्ये विद्युत हा इंटेलिजेंस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. 






विद्युत जामवालच्या हीरो फिम्ल्स या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha