ankita walawalkar-Dhananjay Powar :  बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) घट्ट झालेलं बहिण भावाचं नातं अंकिता (ankita walawalkar) आणि धनंजय (Dhananjay Powar) हे बिग बॉसच्या घराबाहेरही जपताना दिसत आहेत. नुकतच दिवाळीच्या निमित्ताने अंकिता वालावलकर ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कोल्हापूरला धनंजयच्या घरी गेली.यावेळी धनंजय आणि अंकिताने एकत्र भाऊबीजही साजरी केली. 


धनंजयने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर अंकिता आणि त्याचे भाऊबीज साजरी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. यावर अनेकांनी मिश्किल कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नव्हे तर अंकितानेही यावर कमेंट करत म्हटलं की, चांगला फोटो नव्हता का? 


नेटकऱ्यांकडून मिश्किल कमेंट्सचा पाऊस


अंकिता आणि धनंजयच्या या फोटोंवर एकाने कमेंट करत म्हटलं की, ही गिफ्ट घेण्यासाठी आली बाबा एकदाची. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की,ओवाळणी दे दादा तिला नाहीतर लग्नात लय मोठ फर्निचर द्यावं लागेल तुला... दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं,हिस्सो तयार ठेवा... 


धनंजयच्या घरी बिग बॉसच्या स्पर्धकांची रेलचेल


दरम्यान काही दिवसांपासून धनंजयच्या घरी बिग बॉसमधील अनेक स्पर्धक हजेरी लावत आहेत. काही दिवसांपूर्वीच इरिना धनंजयच्या घरी आली होती. त्यानंतर पॅडी दादाही धनंजयच्या घरी गेले. त्यानंतर अंकिताही आता होणाऱ्या नवऱ्यासोबत धनंजयच्या घरी पोहचल्याचं पाहायला मिळतंय. 


धनंजयच्या घरी इरिनाचं जंगी स्वागत 


इरिना नुकतीच धनंजयच्या घरी कोल्हापुरात गेली. त्यावेळी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच यावेळी तिने आणि धनंजयने स्पेशल कोल्हापुरीत संवाद साधला. यावर अनेकांनी कमेंट्स करत इरिनाचं कोल्हापुरात स्वागत केलंय. नंजयच्या पत्नीने आणि आईने औक्षण करुन इरिनाचं स्वागत केलं. तसेच धनंजयसोबत इरीने कोल्हापूरकरांनाही नमस्कार केला.


पॅडी दादाचा खास पाहुणचार


पॅडी दादा एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात गेला होता. त्याचवेळी त्याने धनंजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याचवेळी पॅडी दादा धनंजच्या फर्निचरच्या दुकानावर गेला. इतकच नव्हे तर पॅडी दादाने धनंजयच्या घरी कोल्हापुरी जेवणाचा आस्वादही घेतलाय. दरम्यान घरी जेवणानंतर पॅडी दादाने स्वत:चं ताट उचलून ठेवलं. त्यावेळी धनंजयने म्हटलं की, तुझी बिग बॉसच्या घरातली सवय गेली नाही का? त्यावर पॅडी दादाने म्हटलं की, आमच्या घरात प्रत्येकाचं ताट आम्ही स्वत: उचलून ठेवतो. आम्हाला ती सवयच आहे. असं म्हणत पॅडीने त्याचं ताट स्वत: नेऊन ठेवलं.






ही बातमी वाचा : 


Dhananjay Powar : पॅडी दादासाठी खास कोल्हापुरी बेत, पण जेवणानंतर स्वत:चं ताट उचलून ठेवताच धनंजयची आई म्हणाली...