Dhananjay Powar :  बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) झालेली मैत्री ही वैयक्तिक आयुष्यातही स्पर्धक सांभाळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन भेटीगाठी सध्या सुरु आहेत. नुकतीच परदेसी गर्ल इरिना रुडाकोव्हा (Irina Rudakova) ही कोल्हापुरात धनंजयच्या घरी गेली होती. तिचं धनंजयच्या (Dhananjay Powar) घरी जंगी स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर आता पॅडा दादाही धनंजयच्या घरी पोहचला. त्यामुळे धनंजयच्या घरी सध्या कोल्हापुरी पाहुणचाराचा आस्वाद बिग बॉसचे स्पर्धक घेत आहेत. 


पॅडी दादा एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात गेला होता. त्याचवेळी त्याने धनंजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याचवेळी पॅडी दादा धनंजच्या फर्निचरच्या दुकानावर गेला. इतकच नव्हे तर पॅडी दादाने धनंजयच्या घरी कोल्हापुरी जेवणाचा आस्वादही घेतलाय. धनंजयच्या घरी कोल्हापूर तांबडा पांढऱ्या रस्सा असा खास बेत करण्यात आला होता. 


पॅडीने स्वत: ताट उचलून ठेवलं


दरम्यान घरी जेवणानंतर पॅडी दादाने स्वत:चं ताट उचलून ठेवलं. त्यावेळी धनंजयने म्हटलं की, तुझी बिग बॉसच्या घरातली सवय गेली नाही का? त्यावर पॅडी दादाने म्हटलं की, आमच्या घरात प्रत्येकाचं ताट आम्ही स्वत: उचलून ठेवतो. आम्हाला ती सवयच आहे. असं म्हणत पॅडीने त्याचं ताट स्वत: नेऊन ठेवलं. त्यावर धनंजयच्या आईने धनंजयकडे बोट दाखवून म्हटलं की, ह्याला सांग हे... त्यावर धनंजयने हसत म्हटलं, मी कुठे जेवतो घरात...यावर पुन्हा एकदा घरात एकच हशा पिकला...


इरिनाच्या धनंजयच्या घरी जंगी स्वागत


 धनंजय बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसांपासूनच इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवत होता. पण अगदी काहीच दिवसांत इरिना घरातून बाहेर पडली. त्यामुळे तिची बिग बॉसच्या घरात कोल्हापुरी शिकण्याची शाळा अर्धीच राहिली. पण आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर इरिनाची शाळा पुन्हा सुरु झालीये. इरिना नुकतीच धनंजयच्या घरी कोल्हापुरात गेली. त्यावेळी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच यावेळी तिने आणि धनंजयने स्पेशल कोल्हापुरीत संवाद साधला. यावर अनेकांनी कमेंट्स करत इरिनाचं कोल्हापुरात स्वागत केलंय. त्याचप्रमाणे त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.



ही बातमी वाचा : 


Irina Rudakova : 'नमस्कार कोल्हापूरकर...', धनंजयच्या घरी इरिनाचं जंगी स्वागत; परदेसी गर्ल म्हणाली, 'भावा...'