Ankita Lokhande And Vicky Jain Called  Off Their Reception: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. विकी आणि अंकिताच्या विवाह सोहळ्यासोबतच प्री वेडिंग फंक्शन्स थाटामाटात पार पडले. पण आता विकी आणि अंकिताने रिसेप्शन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 


कोरोनाचा नावा व्हेरिअंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं लागू केलेल्या गाइडलाईन्स पाहता, विकी आणि अंकिताने रिसेप्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता आणि विकीच्या टिमने याबद्दल माहिती दिली. अंकिता आणि विकी यांचं असं मत आहे की, सर्वांनी सुरक्षित रहावं. जर रिसेप्शनला गर्दी झाली तर कोरोना संक्रमण होऊ शकते त्यामुळे विकी आणि अंकिताने रिसेप्शन कार्यक्रम रद्द केला. अंकिता आणि विकीच्या लग्नाला त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रीणींनी हजेरी लावली होती. 
 





अंकिता- विकीचा लग्नामधील रॉयल लूक 


 लग्नात विकीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानी घातली आहे. तर अंकिताने सोनेरी रंगाचा सुंदर वर्क केलेला लेहेंगा घातला आहे. लग्नसोहळ्यात विकीने विंटेज कारमधून एन्ट्री घेतली होती. 


संबंधित बातम्या


Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : राजेशाही थाटात पार पडला अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा


Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट