Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज विकी  जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकली आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोन्ही लव्हबर्ड्स अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.





लग्नात विकीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानी घातली आहे. तर अंकिताने सोनेरी रंगाचा सुंदर वर्क केलेला लेहेंगा घातला आहे. लग्नसोहळ्यात विकीने विंटेज कारमधून एन्ट्री घेतली होती. विकी आणि अंकिताचा काल साखरपुडादेखील पार पडला होता. त्यांनी साखरपुड्यातले फोटोदेखील शेअर केले होते. अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा राजेशाही थाटात पार पडला आहे.





अंकिता लोखंडेच्या संगीत कार्यक्रमाला लावली कंगना रणौतने हजेरी
अंकिता लोखंडेच्या संगीत कार्यक्रमाला कंगना रणौतने हजेरी लावली होती. अंकिता आणि कंगना दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघांनी मणिकर्णिका या चित्रपटात एकत्र काम केले होते. संगीत कार्यक्रमात कंगनाने धमाकेदार नृत्यदेखील सादर केले.