मुंबई : ईशान्य भारतीय खेळाडू मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देताना रौप्य पदकाची कमाई केली आणि भारतभर तिच्या नावाचा जयघोष सुरु झाला. पण देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो, अन्यथा आम्ही देशवासियांसाठी चीनी, नेपाळी, चिंकी किंवा कोरोना असतो अशी भावना मिलिंद सोमनची पत्नी आणि अभिनेत्री अंकिता कोंवरने व्यक्त केली आहे. 


भारतात केवळ जातीय भेदच नाही तर वर्णभेदही मोठ्या प्रमाणावर आहे हे मी माझ्या अनुभवावरुन सांगते असं म्हणत अंकिता कोंवरने आपला राग व्यक्त केला आहे. 


अंकिता कोंवरने त्यावर सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून ईशान्य भारतीयांना देशात मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन  दिली आहे. ती म्हणते की, "जर तुम्ही ईशान्य भारतीय असाल तर तुम्ही देशासाठी मेडल जिंकला तरच तुम्ही भारतीय असता. अन्यथा त्यांच्यासाठी तुम्ही चिंकी, चायनीज, नेपाळी किंवा कोरोना असता. भारत केवळ जातीयभेदाने नाही तर वर्णभेदानेही पोखरला आहे. हे मी मला आलेल्या अनुभवावरुन सांगते."


 






मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. त्यानंतर तिच्या नावाचे गुणगाण सर्व देशभर सुरु आहे. अनेकांनी यावर आपल्याला तिचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. 


महत्वाच्या बातम्या :