Urvashi Rautela Post on Mitchell Marsh World Cup 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup 2023) नुकताच पार पडला असून यात ऑस्ट्रेलियाने विश्चषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झाले. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शलच्या (Mitchell Marsh) एका कृत्याने मात्र क्रिकेट फॅन्सने संताप व्यक्त केला. मिचेल मार्शलचा वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता यासंदर्भात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक खास पोस्ट शेअर करत मिचेल मार्शनला सुनावलं आहे. "भावा, वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी आदर कर", असं ती म्हणाली आहे.


उर्वशी रौतेलाची इंस्टा पोस्ट काय आहे? (Urvashi Rautela Post)


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे. आता तिने इंस्टा पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"मिचेल मार्शल भावा... वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी मान ठेव...फक्त कूल दिसण्यासाठी मिचेलने ट्रॉफीवर पाय ठेवला आहे". उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे मिचेल मार्शलसाठी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 






उर्वशीने शेअर केला वर्ल्डकप ट्रॉफीसोबतचा फोटो


उर्वशीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये उर्वशीने गोल्डन आऊटफिटमध्ये 'वर्ल्ड कप 2023'ची ट्रॉफी हातात घेतलेली दिसत आहे. तर दुसरीकडे त्याच ट्रॉफीवर मिचेल मार्शनने पाय ठेवलेला पाहायला मिळत आहे.


उर्वशी रौतेलाचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Urvashi Rautela Movies)


उर्वशी रौतेलाने सनी देओलसोबत (Sunny Deol) आपल्या सिनेकरिअरची सुरुवात केली आहे. तर 'सिंह साब दी ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक हिंदी सिनेमांत काम केलं. उर्वशी शेवटची मेगास्टार चिरंजीवी यांच्या 'वाल्टर वीरैयै' या सिनेमात दिसली होती. तिनं ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.


संबंधित बातम्या


Mitchell Marsh: हातात बिअर आणि विश्वचषकावर पाय;मिचेल मार्शच्या लज्जास्पद कृत्यामुळे चाहते संतापले