Anant-Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी सध्या त्यांच्या सर्वात धाकट्या लेकाची लगीनघाई सुरु आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या लग्नसोहळ्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय.  गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर आता 12 जुलै रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण त्यांच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी सध्या समोर येत आहे. 


अंबानी कुटुंबात लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. स्वत: नीता अंबानी या अनंत-राधिकाच्या लग्नाच्या तयारीत लक्ष घालत आहे. काही दिवसांपासून अनंत - राधिकाचे लग्न हे लंडनमध्ये होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता त्यांचे लग्न लंडनमध्ये होणार नसल्याची माहिती देखील समोर आलीये. त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नामध्ये किती कोटी रुपये खर्च केले जाणार याचा देखील अंदाज वर्तवला जातोय. 


लंडनमध्ये नाही होणार अनंत-राधिकाचं लग्न


12 जुलै रोजी अनंत आणि राधिकाचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाबाबत रोज नववीन अपडेट्स समोर येतात. या आलिशान सोहळ्याला नेहमीप्रमाणे मोठे सेलिब्रेटी आणि दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनंत आणि राधिकाच्या लग्नाबाबत सातत्याने वेगवेगळे दावे केले जात आहेत. विरल भयानीच्या रिपोर्ट्सनुसार, अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा हा मुंबईतच पार पडणार आहे. याआधी इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, हा सोहळा लंडनमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


लग्नाला इतके कोटी रुपये खर्च होणार?


अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका छापण्यात आली असून पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अहवालांनुसार लग्नपत्रिका नऊ पानांची आहे. रिपोर्ट्सनुसार, प्री-वेडिंग फंक्शनसाठी अंबानी कुटुंबियांनी जवळपास 1250 कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळे अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात अंबानी कुटुंब जवळपास 2000 कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दिग्गज मंडळी राहणार उपस्थित


रिपोर्ट्सनुसार, अनंत-राधिकाचे लग्न लग्न लंडनमधील स्टोक पार्क इस्टेट येथे होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांचा संगीत सोहळा अबू धाबी येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाला बॉलीवूड, क्रिकेट, व्यवसाय आणि राजकारणाशी संबंधित अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहू शकतात. त्याचप्रमाणे अजूनतरी लग्नसोहळ्यातील कोणत्याही पाहुण्यांची यादी समोर आलेली नाही किंवा अंबानी कुटुंबाकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.


प्री-वेडिंग सोहळ्याचा आलिशान थाट


जामनगरमध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प इत्यादी जगभरातील मोठ्या व्यक्ती या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.  लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये, अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांना चार्टर्ड प्लेन, वॉर्डरोब सेवा, जागतिक दर्जाचे शेफ, पिकअप आणि ड्रॉपसाठी लक्झरी वाहने यांसारख्या अनेक सेवा दिल्या होत्या. 


ही बातमी वाचा : 


मंदिरात गेला अन् दान केले तब्बल 5 कोटी, मुकेश अंबानींच्या मुलाच्या दानशूरतेची चर्चा!